Jhimma 
मनोरंजन

मराठी कलाकारांचा 'झिम्मा' यशस्वी; केली इतक्या कोटींची कमाई

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत.

स्वाती वेमूल

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा' Jhimma हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. वीकेंडला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर 'झिम्मा'चे प्री बुकिंगही जोरदार झाले. हिंदी चित्रपटांची तगडी टक्कर असतानाही 'झिम्मा' चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरत आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने ४.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई २.९८ कोटी रुपये इतकी झाली. Jhimma Box Office Collection

'झिम्मा'ची दुसऱ्या आठवड्यात १.७३ कोटी रुपयांची कमाई झाली. कमाईचा हा आकडा येत्या दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT