Sher Shivraj movie esakal
मनोरंजन

Sher Shivraj Trailer: आपला भगवा आदिलशाहीच्या छाताडात गाडायचा!

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराजचा ट्रेलर आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युगंधर ताजणे

Marathi Movie: मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराजचा ट्रेलर आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला अवघ्या (Matrahi Entertainment) तासाभरात सव्वा लाखांहून अधिक लाईक्स आणि व्ह्युज मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट (Sher Shivraj Movie) मालिका तयार करणाऱ्या लांजेकर यांच्या यापूर्वीच्या फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. पावनखिंडनं तर बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड देत पावनखिंडनं नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता शेर शिवराजच्या ट्रेलरकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. तो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी लांजेकर यांच्या शेर शिवराजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी पावनखिंडला मिळालेल्या जोरदार प्रतिसादानं प्रेक्षकांची शेर शिवराज बाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. पावनखिंडमध्ये अजय पुरकर यांनी बाजीप्रभु यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या मराठी चित्रपटानं मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहत आहेत. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची संघर्षगाथा दाखवण्याकडे अनेकांचा ओढा आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका अष्टक करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प लवकरच प्रेक्षक भेटीसाठी सज्ज झाला आहे.

शेर शिवराजची सुरुवात अफजल खानच्या स्वराज्यावरच्या अरिष्टानं होते. तो आता स्वराज्यावर चालुन आला आहे. त्याला थेट दिल्लीवरुन शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. पोलादी पहार हातानं सहजासहजी वाकवणारा अफजलखान, पहाडासारखा दिसणारा, क्रुर, संतापी, रागीट म्हणून ओळख असलेल्या अफजलखानानं स्वराज्यामध्ये केलेल्या क्रुर कृत्याची ओळख आपल्याला शेर शिवराजच्या ट्रेलरमधून होते. प्रभावी संवाद, लक्ष वेधून घेणारे छायाचित्रण, कौतुकास्पद कामगिरी करणारे कलाकार यामुळे शेर शिवराजच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अवघ्या काही तासाभरातच त्या ट्रेलरला लाखो व्हयुज आले असून नेटकऱ्यांना आता शेऱ शिवराज मोठ्या पडद्यावर पाहण्याचे वेध लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT