Marathi Movie After Operation London Cafe, Virat Madke Look Google
मनोरंजन

Marathi Movie: हातात बंदूक,डोळ्यात सूड भावना..',ओळखूच येईना 'वीर दौडले सात'चा हिरो,विराट मडके चर्चेत...

'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या मराठीसोबत साऊथमध्ये झळकणाऱ्या सिनेमात विराट मडके एकदम रावडी लूकमध्ये दिसत आहे.

प्रणाली मोरे

Marathi Movie: हातात बंदूक आणि डोळ्यात सूड भावना या अभिनेत्याचा हा लूक थक्क करणार आहे. आत्तापर्यंत आपण या अभिनेत्याला आव्हानात्मक भूमिकेत पाहिलं आहे. हा अभिनेता आहे विराट मडके. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टीचा सर्वात मोठा सिनेमा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचे तीन पोस्टर्स आत्तापर्यंत समोर आले आहेत आणि प्रत्येक पोस्टरमधून कलाकारांचे चॅलेंजिंग लूक समोर आले आहेत आणि आता विराट मडकेचाही हा लूक प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण करेल. विराट मडकेचा आज वाढदिवस त्या निमित्त त्याचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित केले. (Marathi Movie After Operation London Cafe, Virat Madke Look)

केसरी’ सिनेमातून पदार्पण केल्यानंतर विराटने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचा सोयरीक हा सिनेमा रिलीज झाला होता. त्या शिवाय विराट वीर दौडले सात या सिनेमातही भूमिका करतो आहे.

हेही वाचा- दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमातील लूक बद्दल विराट सांगतो, ‘’माझ्यासाठी हा सिनेमा सर्वच बाजूंनी आव्हानात्मक होता. ही भूमिका साकारण्यासाठी पूर्ण अभ्यास मी केला होता. त्याचप्रमाणे फिजीकलीही हा सिनेमा बराच कष्टदायी होता. कारण जंगलात, डोंगराळ भागात याचे शूट झाले आहे. या लूकमागे सर्व टीमची मेहनत आहे. पोस्टरमध्ये दाखवल्या प्रमाणे रावडी असा लूक दिसत आहे आणि सिनेमा पाहिल्यावरच याचा उलगडा होईल. ‘’

निर्माते दीपक पांडुरंग राणे आणि विजय शेट्टी आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा मराठी आणि कन्नडा या दोन भाषेत शूट झाला आहे. या बद्दल बोलताना विराट म्हणतो, ‘’कर्नाटकमध्ये शूट करणं, तिथली संस्कृती जाणू घेणं ,तिथली भाषा समजणं हाही खूपच छान अनुभव होता. सिनेमा दोन भाषेत शूट झाला त्यामुळे कन्नडा भाषा मी थोड्याफार प्रमाणात शिकलो.’’

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी - कन्नडा सह हिंदी, तेलगु, तमिळ, मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे. दिपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या पॅन इंडिया सिनेमात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी , शिवानी सुर्वे यांच्याही भूमिका आहेत. २०२३ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT