Marathi Movie: Akshay Kumar as chhatrapati Shivaji Maharaj in Marathi Movie, Netizens Warned actor Google
मनोरंजन

Akshay Kumar:छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षयला पाहताच लोकांनी दिला इशारा; म्हणाले,'लक्षात ठेव..'

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमातील अक्षय कुमारचा महाराजांच्या भूमिकेतला फर्स्ट लूक समोर आला आहे.

प्रणाली मोरे

Akshay Kumar: सम्राट पृथ्वीराज ही ऐतिहासिक भूमिका साकारल्या नंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी अक्षयनं कसून तयारी केली आहे. त्यात मराठी सिनेमात अक्षय दिसणार असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' मध्ये अक्षय कुमार आपल्याला दिसणार आहे,या सिनेमाच्या माध्यमातून त्यानं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंग सुरु झालं आहे. अक्षय कुमारनं सिनेमाची पहिली झलक शेअर केली आहे.(Marathi Movie: Akshay Kumar as chhatrapati Shivaji Maharaj in Marathi Movie, Netizens Warned actor)

वसीम कुरेशी यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनत असलेल्या या सिनेमात सुवर्ण इतिसातलं एक पान म्हणजे,शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं जाणार आहे. बोललं जात आहे की, सिनेमात हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि त्याचा शानदार प्रवास अन् त्यासाठी निस्वार्थीपणे ज्यांनी ज्यांनी त्याग,बलिदान दिलं त्या वीरांचं स्मरण केलं जाणार आहे. अक्षयनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपली झलक शेअर करत लिहिलं आहे की,''जय भवानी,जय शिवाजी!''

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,''आज मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे शूटिंग सुरु करत आहे. ज्यात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाली हे माझं भाग्य समजतो. शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासापासून मी प्रेरणा घेत आणि मॉं जिजाऊ यांच्या आशीर्वादानं मी या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करेन. तुमचा आशीर्वाद कायम राहू दे''. यावर अनेक चाहत्यांनी अक्षयला या सिनेमासाठी पाठिंबा दिला आहे तर काहींनी शुभेच्छा दिल्यात,तर काही लोकांनी मात्र अक्षयला भूमिकेसंदर्भात इशारा दिला आहे.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

एका नेटकऱ्यानं तर स्पष्टपणे म्हटलं आहे की,'हा महाराष्ट्र आहे भावा,इथे चूकीसाठी माफी नाही,त्यामुळे नीट लक्षपूर्वक काम कर'. दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'बस्स...फक्त शिवाजी महाराजांच्या भूमिकेत परफेक्ट शोभून दिसू दे तू..नाहीतर पृथ्वीराज सारखी अवस्था होईल'. आणखी एक जण म्हणाला आहे,'पृथ्वीराज सिनेमात जे केलंस तसं पुन्हा नको करूस प्लीज'. तर एकानं तर धमकी देत लिहिलं आहे,'शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यात चूक केलीस तर लक्षात ठेव...'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT