marathi movie ananya new song tu dhagdhagti aag released sakal
मनोरंजन

‘अनन्या’चा 'तो' प्रवास उलगडणारे ‘तू धगधगती आग’ गाणे प्रदर्शित..

'अनन्या' चित्रपटातील तिचा संघर्ष दाखवणारे नवे गीत प्रदर्शित झाले आहे.

नीलेश अडसूळ

ananya movie : प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे प्रदर्शित झाले असून असून या जबरदस्त गाण्याला बॅालिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. अभिषेक खणकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे.

(marathi movie ananya new song tu dhagdhagti aag released )

आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत ‘अनन्या’ जिद्दीने आणि खंबीरपणे लढत असल्याचे यात दिसतेय. ‘शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ या टॅगलाईनचा अर्थ यातून स्पष्ट होत असून प्रचंड ऊर्जेने भरलेले हे गाणे आहे. एका प्रसंगात 'अनन्या'चे दोन्ही हात ती गमावते. त्यांनंतर तिला कराव्या लागणाऱ्या संघर्षाची झलक या गाण्यातून दिसली आहे. या चित्रपट अनन्याची भूमिका अभिनेत्री 'हृता दुर्गुळे' (hruta durgule) हिने साकारली आहे.

(hruta durgule new movie) (hruta durgule songs in ananya )

दिग्दर्शक प्रताप फड या गाण्याबद्दल म्हणतात, “या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे हे गाणे विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केले. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणे अधिकच बळ देणारे बनले.’'

निर्माता रवी जाधव म्हणतात, '' हे गाणे अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यातील प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.'' एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीवर एन्टरटेन्मेंट व रवी जाधव निर्मित या चित्रपटाचे लेखन प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT