chowk, chowk teaser, pravin tarde, kiran gaikwad, snehal tarde, sanskruti balgude, pune, kothrud SAKAL
मनोरंजन

Chowk Teaser: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा धमाकेदार टीझर रिलीज

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

Devendra Jadhav

Chowk Teaser News: सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे.

त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

(marathi movie chowk teaser out now starring pravin tarde, kiran gaikwad, sanskruti balgude)

टीझरची सुरूवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात.

सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत.

प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील.

यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की! टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी... सुरुवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ हा संवाद असो किंवा

टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद असो, यावरून असं लक्षात येतंय की अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्वच पातळ्यांवर बाजी मारली आहे.

चौकच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रविण तरडेंची खास शैली, रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांची वेगळी भूमिका, उपेंद्र लिमयेंचा रांगडा अभिनय, स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे यांच्या संवेदनशील भूमिका आपल्याला चौकमध्ये बघायला मिळतील.

तर, किरण गायकवाड चौकमध्ये तरूणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय, चौकच्या निमित्ताने किरण प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसेल.

तसेच वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चौकात आलेले हे सर्व कलाकार आपल्यासमोर नक्की काय घेऊन येत आहेत, हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

टीझरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती.

यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT