Dagadi Chawl 2 Movie News
Dagadi Chawl 2 Movie News sakal
मनोरंजन

'जय शंभू नारायण..' अरुण गवळी, मुंबईचा थरार आणि 'दगडी चाळ २' लवकरच..

नीलेश अडसूळ

Daagadi Chaawl 2 : मुंबई आता शांत झालीय. पूर्वीसारखं गँगवॉर इथे उरलेलं नाहीय. मुंबई पोलिसांनी हे गँगवॉर संपवून टाकलं. आता मागे उरल्या आहेत, त्या फक्त गँगवॉरच्या भयानक आठवणी. आज मुंबई अंडरवर्ल्डच्या आठवणी जागी ठेवणारी एक वास्तु आजही मुंबईत आहे ती म्हणजे दगडी चाळ आणि दगडी चाळ म्हणजे अरुण गवळी. काही वर्षांपूर्वी दगडी चाळीचा थरार दाखवणारा 'दगडी चाळ' चित्रपट आला होता. त्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता या चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली. (marathi movie dagadi chawl 2 will release on 18 august)

'चुकीला माफी नाही' असं म्हणणाऱ्या अरुण गवळींचा ( Arun Gawli) म्हणजे डॅडींचा ( Daddy) दबदबा पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दगडी चाळ चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे (makarand deshpande) यांनी अरुण गवळींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही मकरंद देशपांडेच अरुण गवळींच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhari) आणि मकरंद देशपांडे यांनी चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे. या टीझर मध्ये भर पावसात तुडुंब भरलेल्या गर्दीतून अरुण गवळी एंट्री घेत आहेत असं दाखवण्यात आले आहे.

या टिझरला एक सुंदर कॅप्शन दिले आहे, 'डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजे दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. ( Daagdi Chaawl 2 Release Date) येत्या18 ऑगस्टला 'दगडी चाळ 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अंकुश आणि अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) हिची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली. विशेष म्हणजे 'दगडी चाळ २' मधेही अंकुश आणि पूजा आपल्या भेटीला येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT