Jhimma Movie
Jhimma Movie 
मनोरंजन

'झिम्मा' प्रेक्षकांना भावला, सिनेमागृहात 'पंच्याहत्तरी'!

सकाळ डिजिटल टीम

Jhimma marathi movie: कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला होता. दरम्यान काही चित्रपटांनी (Entertainment News) मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला. यासगळ्यात मराठी चित्रपट देखील मागे नव्हते. त्यामध्ये हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित झिम्मानं थिएटरमध्ये 75 दिवस पूर्ण केले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद केल्याचे दिसून आले आहे. गेले अडीच महिने ९१ टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे.

लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही (Bollywood Movies) अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात ७५ दिवस साजरे केले आहेत. कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून १४. ५० करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान पटकावला आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' १९ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला. एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला. प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला. जगभरात ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या ५० व्या दिवशी महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली ५० दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT