Marathi Entertainment: कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन (Entertainment) विश्वाला बसला होता. त्यातून आता कुठे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक सावरताना दिसत आहे. अशावेळी कित्येक मराठी चित्रपट, मालिका यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीला सामोरं जावं लागलं आहे. सध्या मराठी मनोरंजन विश्व त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला झिम्मा (Jhimma), यावर्षी प्रदर्शित झालेला झोंम्बिवली (Zombivli) , पांघरुण, वरण भात लोन्चा कोण नाय कोंचा, या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांवर छाप उमटवली आहे. त्यामध्ये अंकुश चौधरी, सिद्धार्ध जाधवच्या लोच्या झाला रे या चित्रपटानं आता थेट परदेशात बाजी मारली आहे.
पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित 'लोच्या झाला रे' (Lochya Zala Re) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांना भरभरून हसवले. अवघ्या महाराष्ट्रात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सिद्धार्थ जाधव(Sidhartha jadhav), सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. परदेशातील प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे. काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता पाहता त्या पडद्यावरील कल्ल्यात प्रेक्षकही सहभागी होऊन जातो. लोच्या झाला रे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आदी, मानव, डिंपल आणि काका यांच्यात चाललेला गोंधळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धमाल मस्ती आणि प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट इतका हिट ठरला की, परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी परदेशातील मराठी प्रेक्षकांकडून होऊ लागली. त्यामुळे ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ही सगळी टीम परदेशातही कल्ला करणार आहे.
दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘लोच्या झाला रे’ परदेशवारी करणार आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की, परदेशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.’’ तर मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, ‘’हा चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.