marathi movie tamasha live new song phad lagalay out sakal
मनोरंजन

'तमाशा लाईव्ह'ने लावलाय गाण्यांचा सपाटा, आता 'फड लागलाय' प्रदर्शित..

माध्यम जगतातील गोंधळ समोर आणणाऱ्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटांमध्ये बातमयांचा फड रंगणार आहे पण तो कसा हे या गाण्यातून दिसते.

नीलेश अडसूळ

tamasha live movie: संगीत… भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम. या संगीतातून जर एखादी कथा पुढे जात असेल तर? संगीतप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरेल. असाच संगीत नजराणा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव सज्ज झाले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'फड लागलाय' असे या गाण्याचे बोल असून 'ब्रेकिंग न्यूज' मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत या गाण्यात पाहायला मिळत आहे. हे गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

(marathi movie tamasha live new song phad lagalay out)

‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) आणि हेमांगी कवी (hemangi kavi)वर चित्रीत या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

या गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात," 'तमाशा लाईव्ह'ची सर्वच गाणी उत्तम आहेत. मला याचा फार आनंद होत आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली की, एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची गाणी मी या चित्रपटात लिहीली आहेत. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.''

एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित 'तमाशा लाईव्ह' सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT