Ved movie Ved movie song release  Esakal
मनोरंजन

Ved movie song: वेड तुझं.... रितेश-जिया शंकरचा बोल्ड अंदाज करेल घायाळ

सकाळ डिजिटल टीम

Ved movie song release: सध्या मराठी मनोरंजन विश्वचं नव्हे तर पुर्ण बॉलिवूडमध्ये अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'वेड'चा टीझर शेअर केल्यापासूनच चाहते या चित्रपटाबाबत उत्सूक आहेत. त्याच्या टिझरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता या चित्रपटाच पहिलं रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'वेड'चं टिझर रिलिज झाल्यापासूनच या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. काल या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर रितेशने सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या गाण्याच्या काही ओळी टिझरमध्ये ऐकल्यापासूनच या गाण्याची सर्वत्र चर्चा होत होती. आता हे गाणं देश म्युजिक या यूट्यूब चॅनलवर रिलिज झालं. या चित्रपटातील हे पहिलंच रोमॅंटिक गाणं आहे.या गाण्यात रितेश देशमुख आणि जिया शंकर रोमांन्स करतांना दिसत आहे.

हे गाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय- अतुलने संगीतबद्ध करत गोयले आहे तर गाण्याचे लिरिक्स अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांचे आहेत. या गाण्याने रिलिज होताच सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला तासाभरातच पाच हजाराहुन अधिक व्ह्युज आले आहे. हे गाणं रितेशच्या चाहत्यांना आवडत आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

दरम्यानं, 'वेड' चित्रपटचं टायटल सॉंग हे आज म्हणजे मंगळवारी प्रदर्शित होणार होते. पण हे गाण अधिकृत प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मिडियाच्या यूट्यूबवर लिक झाल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत होती.

गाणं लिक झाल्याच्या चर्चा सर्वत्र होत असतांनाच चित्रपटच्या निर्मात्यांकडून स्पष्टिकरणही दिलं होतं की ओरिजनल गाणं हे या गाण्यापेक्षा पुर्णपणे वेगळे आहे. ते आज प्रदर्शित होणार आहे. त्यामूळे दावा करण्यात आलेलं गाणं हे वेड चित्रपटातील गाण्यापेक्षा वेगळे आहे. गाणं लिक होण्याच्या बातम्या ह्या अफवा असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं होत आणि त्याप्रमाणेच खरचं हे गाणं लीक झालेल्या गाण्यापेक्षा पुर्ण वेगळे आहे. हे गाणं चाहत्यांना वेड लावून सोडेल यात काही शंकाच नाही.

वेड चित्रपटातील गाणे आणि चित्रपट हिट होइल असं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत तर या चित्रपटाद्वारे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT