Marathi Movie' Victoria' Release date postpone due to hollywood 'Avtar' Release.
Marathi Movie' Victoria' Release date postpone due to hollywood 'Avtar' Release. Esakal
मनोरंजन

Marathi Movie: 'अवतार 2' नं केला सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' चा गेम, आपल्याच घरातून मराठी सिनेमा हद्दपार

प्रणाली मोरे

Sonalee Kulkarni Victoria Release Date Postpone: सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोगचा बहुचर्चित हॉररपट 'व्हिक्टोरिया' आज १६ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. पण इतक्यात बातमी समोर येतेय की सिनेमाचं प्रदर्शन तब्बल महिनाभर पुढे ढकलण्यात आलं आहे. हा सिनेमा आता १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असं समोर आलं आहे. आणि याचं कारण आहे बहुचर्चित,बिग बजेट सिनेमा 'अवतार'.

जवळच्या सूत्रांकडून कळलं आहे की हॉलीवूडच्या 'अवतार' मुळे मराठी व्हिक्टोरियाला स्क्रीन मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या सिनेमाचं नुकसान होऊ नये,लोक एक उत्तम कलाकृती पाहण्याला मुकू नयेत म्हणून व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी नमतं घेत व्हिक्टोरियाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याचं कळत आहे. अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचं कारण सांगितलेलं नाही. (Marathi Movie' Victoria' Release date postpone due to hollywood 'Avtar' Release)

मराठी प्रेक्षक हा चोखंदळ असल्याचं वेळीच समजून अभिनेता विराजस कुलकर्णीनं आपला पहिला-वहिला 'व्हिक्टोरिया' सिनेमा बनवला. अर्थात हे त्याच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर लक्षात आलंच असेल आपल्याला. आनंद पंडित,रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी व्हिक्टोरिया सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून विराजस कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपली नवी इनिंग सुरु करत आहे.

काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. तेव्हाच सिनेमात रहस्य आणि भीतीची छाया ठासून भरली असणार याचा अंदाज आला होता. सिनेमाच्या ट्रेलरनंही उत्कंठा वाढवलेली. सिनेमाचं सर्वत्र जोरदार प्रमोशनही झालं होतं. पण आता प्रदर्शन पुढे ढलल्यानं पुन्हा नव्यानं प्रमोशन करण्याचा खर्च निर्मात्यावर पडणार असं चित्र सध्यातरी दिसत आहे.

अनेकदा बड्या सिनेमांमुळे छोट्या सिनेमांची गळचेपी होते. बड्या सिनेमांमुळे छोट्या बजेटच्या सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीत अन् मग छोट्या निर्मात्यांना जे मिळालंय त्यात समाधान मानावं लागत आहे. आता व्हिक्टोरियावरही तिच वेळ आली आहे. रिजनल सिनेमाला आपल्याच राज्यात स्क्रीनसाठी भांडावं लागत आहे. पुन्हा एकदा आपल्याच घरात आपण परके हे चित्र दिसून आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT