Marathi Movie Victoria Trailer Release, Sonalee Kulkarni, Pushkar Jog, Aashay Kulkarni Google
मनोरंजन

Victoria Trailer: पहिल्या फ्रेमपासनं छातीची धडधड वाढवतो सोनालीचा 'व्हिक्टोरिया', ट्रेलर एकदा पहाच!

'व्हिक्टोरिया' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता विराजस कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपली नवी इनिंग सुरु करत आहे.

प्रणाली मोरे

Victoria Trailer:मराठी प्रेक्षक हा चोखंदळ असल्याचं वेळीच समजून अभिनेता विराजस कुलकर्णीनं आपला पहिला-वहिला 'व्हिक्टोरिया' सिनेमा बनवला आहे. अर्थात हे त्याच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येईलच आपल्याला. आनंद पंडित,रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी व्हिक्टोरिया सिनेमाची निर्मिती केली आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून विराजस कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपली नवी इनिंग सुरु करत आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. तेव्हाच सिनेमात रहस्य आणि भीतीची छाया ठासून भरली असणार याचा अंदाज आला होता. आता मात्र सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर त्याची उत्कंठा अधिक वाढणार हे नक्की. (Marathi Movie Victoria Trailer Release, Sonali Kulkarni, Pushkar Jog, Aashay Kulkarni)

व्हिक्टोरिया सिनेमात सोनाली कुलकर्णी,पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासून तुमच्या छातीची धडधड वाढवेल हे आम्ही म्हटलंय ते १०० टक्के खरंय. एकदा पहा ट्रेलर आणि ठरवा, बातमीत लिंक जोडली आहे.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

ट्रेलरमध्ये पहिल्याच फ्रेममध्ये लंडनमधील अवाढव्य आलिशान हॉटेल व्हिक्टोरिया आपलं स्वागत करतो. पण कुठेतरी त्या हॉटेलचं एक निगेटिव्ह वातावरण आपल्याही नजरेतून सुटणार नाही. त्याच हॉटेलमध्ये गेस्ट म्हणून आलेले सोनाली आणि आशय जेव्हा एन्ट्री घेतात तेव्हापासून स्क्रीनवर त्यांच्याअवती भोवती कोणीतरी आहे असा भास कॅमेरा आपल्यालाही करवून देतो. अशातच हॉटेलच्या एका अशा रेस्ट्रिक्टेड एरियात सोनाली आणि आशय जातात अन् मागून पुष्करनं दिलेला आवाज दोन सेकंद हृद्याची धडधड बंदच करून टाकतो.

अन् पुढे ओळख होते त्याच ट्रेलरमधून हॉटेलमध्ये खून होऊन मृत्युमुखी पडलेल्या रेणुकाची. कोण आहे ही रेणुका? तिचा आणि हॉटेलचा काय संबंध?तिचा खून कसा झाला,तिला कुणी मारलं? सोनालीला तिचे भास का होतायत? असे सगळे प्रश्न हा ट्रेलर आपल्या मनात निर्माण करतो. शेवटच्या फ्रेममध्ये सोनालीचा हात कुणीतरी अचानक धरतं ते पटकन नजरेसमोर येतं...अन श्वास तिथंच रोखला जातो...ट्रेलर इथे संपला असला तरी सिनेमाची उत्कंठा वाढलीय आता प्रेक्षकांची. आता प्रतिक्षा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्याची.

दिग्दर्शक विराजस कुलकर्णीनं सिनेमाचा ट्रेलर शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय की, ''मराठी प्रेक्षकांना नेहमीच नवं, आधी न बघितलेलं हवं असतं... ते त्यांना द्यायचा आमचा हा प्रयत्न! खरंच theatre मध्ये जाऊनच मजा येईल अशा ह्या आमच्या व्हिक्टोरिया ची पहिली झलक!''. सिनेमा १६ डिसेंबरला रिलीज होतोय,तेव्हा वाट पाहूया..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: गणेशभक्तांना दिलासा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय; पहा वेळापत्रक

CM Devendra Fadnavis : ‘’गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे..’’ ; जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : प्रभाग रचनेवर आता रडत बसू नका; निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?

Latest Marathi News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT