Swapnil Joshi Share Vaalvi Movie teaser Instagram
मनोरंजन

Swapnil Joshi: 'नव्या वर्षात सगळी secretes उलगडतील..', स्वप्निल जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

स्वप्निल जोशीनं सोशल मीडियावर 'वाळवी'चा एक टीझर शेअर केला आहे,ज्यानं सिनेमाविषयीचा डोक्यात सुरु असलेला गोंधळ अधिक वाढवला आहे.

प्रणाली मोरे

Swapnil Joshi: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासूनच सिनेमाविषयीची उत्सुकता निर्माण झाली. सिनेमाच्या टीझरने तर अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेयत. खरंतर सिनेमाचा जॉनर काय असेल यावरनं जोरदार चर्चा रंगलेली दिसली. सिनेमा थ्रिलर असेल की रोमॅंटिक की कॉमेडी असे अनेक प्रश्न त्या टीझरवर चाहत्यांनी सिनेमाच्या टीमला विचारले आहेत.

आता सिनेमाचं कथानक कशावर आधारित आहे हे रीलिजनंतर कळेलच तोपर्यंत उत्सुकतेचा गोंधळ मात्र कायम असणार आहे. पण त्याचं झालं असं की आता पुन्हा सिनेमाचा एक नवा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला गेला अन् चाहत्यांना नव्या प्रश्नांनी घेरलं.. (Swapnil Joshi Share Vaalvi Movie teaser)

स्वप्निल जोशीनं आपल्या इन्स्टाग्रामवर वाळवीचा एक नवीन टीझर पोस्ट केला. ज्यात दिसत आहे की त्याच्या एका हातात पिझ्झा आहे आणि एका हातात फावडा...आता हे नक्की काय चाललंय स्वप्निलचं काही कळेना. पिझ्झा खाताना त्यानं फावडा का पकडलाय...नेमकं काय करायचंय त्याला...असे अनेक प्रश्न स्वप्निलला लोक विचारताना दिसतायत..

स्वप्निलनं झी स्टुडिओच्या या शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की...''एका हातात पिझ्झा,दुसऱ्या हातात फावडं...स्वप्निल जोशी सोबत नेमकं घडतंय काय? नव्या वर्षात सगळी सीक्रेट्स उलगडतील...वाळवी १३ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित.. ''अशी एकंदरीत पोस्ट आहे.

'वाळवी' सिनेमात स्वप्निल जोशी,सुबोध भावे, अनिता दाते,शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परेश मोकाशी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असल्यानं यावेळीही एक नवं कथानक थिएटरकडे पावलं वळवायला मजबूर करेल अशी आशा सध्या तरी निर्माण झालीय. परेशच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'चि व चि.सौ.का' या सिनेमांनी त्याचा असा एक मोठा चाहतावर्ग आधीच निर्माण केला आहे. त्यामुळे 'वाळवी' सारखा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणून परेश पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षांना खरा उतरतो का याची चर्चा आता रंगली आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT