मनोरंजन

वडील समोसे विकायचे, आज नेहाकडे आहे आलिशान बंगला, लक्‍झरी कार ! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई ः सद्या बॉलिवूडची आघाडीची व प्रसिध्द गायिका म्हणून ओळख नेहा कक्करची असून तिचा आज वाढदिवस आहे. पण तिचा बालपण ते गायिकेचा उच्च स्थानापर्यंत पोहचण्याची तिची संघर्ष कथा देखील तेवढीच रोमांचक आहे. म्हणूनच ती इतकी लोकप्रियता मीळविल्यानंतरही ती अजूनही जमिनीशी जोडलेली आहे. 

नेहा कक्कर आणि तिच्या कुटुंबीयांनी खूप हालाखिचे दिवस काढले असून कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नेहाचे वडील बहिण सोनू हि च्या कॉलेजबाहेर समोसा विकायचे यामुळे बऱ्याच वेळा तिन्ही भावंडांना शाळेतील मुले चिडवत असायचे. वडिलांचा असा संघर्ष पाहता नेहा, तिचा भाऊ टोनी आणि बहीण सोनू कक्कर यांनी जागरणमध्ये गाणी म्हणण्याचे सुरू केले. नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही कसल्याही वातावरणात म्हणजे गरम असो की थंड, संध्याकाळी 7 ते सकाळी 5 या वेळेत गाणे गायचो. 

त्याच "शो' ची ती आता "जज' 
नेहाने गायणाबाबत कठोर परिश्रम घेत इंडियन आयडल "शो' च्या दुसऱ्या सत्रात तीने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. आणि नेहा त्याच "शो' मध्ये "जज' म्हणून काम करीत आहे. लहानपणी भाड्याच्या घरात राहत असलेल्या नेहाकडे एक आलिशान घर आणि लक्‍झरी कार आहे. 

माझ्यासाठी स्टारडम काहीही नाही 
नेहा एका मुलाखतीत म्हणाली, "माझ्यासाठी स्टारडमसारखे काहीही नाही. मला फक्त अशी इच्छा आहे 
की देव माझ्यावर दया करेल आणि मला आणखी काम मिळेल. मला माहित आहे की त्याच दिवशी स्टारडमचे भूत माझ्या डोक्‍यावर पडले आहे, कोणीतरी माझी जागा घेईल आणि मला अदृश्‍य होण्यास जास्त वेळ लागणार नाही. म्हणूनच मी माझे शहाणपण त्या जागेवरच ठेवतो आणि जमिनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT