38 Krushna Villa
38 Krushna Villa  esakal news
मनोरंजन

38 कृष्ण व्हिला’ ची पर्वणी: ‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’?

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News: कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला (Marathi Actors) होता. त्याचा परिणाम चित्रपटांबरोबरच मराठी नाट्यसृष्टीलाही सोसावा लागला होता. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले होते. त्यांच्या (Social media news) दोनवेळच्या भाकरीचा प्रश्न यानिमित्तानं झाला होता. अशावेळी मराठी नाट्यसृष्टीतील काही कलाकारांनी पुढाकार घेऊन त्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर नाट्यसृष्टी पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशातच विजय केंकरे यांच्या नव्या नाटकाची चर्चा आहे. 38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे दिसणार आहेत.

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर वैविध्यपूर्ण विषयांवरील नवीन अनेक नाटके दाखल झाली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, सस्पेन्स, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘ डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी रंजनाची दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला होणार आहे. ‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा... गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.

38 Krishna villa

‘38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ.गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत ह्या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! 38, कृष्ण व्हिला ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.

Dr.Girish Oak

डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत 38 कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला होणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT