Bigg Boss Marathi 4: Kiran Mane and Prasad Jawade fight,arguments Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4:किरण मानेंना मारायचाच बाकी होता प्रसाद...एका 'डिप्रेशन' शब्दानं उडाला भडका...

बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडल्यावर किरण मानेंनी प्रसाद जवादेवर काही आरोप केले ज्यामुळे प्रसाद भडकल्याचं प्रोमोमधून समोर आलं आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात काल नुकतंच नॉमिनेशन कार्य पार पडलं...आणि अर्थातच नॉमिनेशन झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच सदस्य एकमेकांवर आगपखड करताना दिसले. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरात राहण्यास अपात्र सदस्यांमध्ये अमृता देशमुख, प्रसाद, अमृता धोंगडे, विकास, अपूर्वा आणि किरण यांची नावे इतर सदस्यांनी नॉमिनेशन प्रक्रियेत दिली आहेत. आता यामधनं कोणत्या सदस्याला बाहेर पडावं लागणार आणि कोण सेफ होणार हे लवकरच कळेल. (Bigg Boss Marathi 4: Kiran Mane and Prasad Jawade fight,arguments)

नॉमिनेशन कार्य पार पडलं नाही तोवर बिग बॉसच्या घरात मोठा राडा पहायला मिळाला,तो किरण माने आणि प्रसाद यांच्यात. या भांडणाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये प्रसाद किरणला म्हणताना दिसत आहे,'सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका घेतलायस का तू?', त्यावर किरण माने प्रसादला म्हणताना दिसत आहेत,'मी नाही घेतला...पण जे समोर दिसत आहे ते सांगतो आहे. काही विमझिकल लोकांना शनिवारी ठरवून डिप्रेशन येतं आणि रविवारी ते जातं'. त्यावर प्रसाद किरण मानेनां म्हणताना दिसतोय,'तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वगैरे? डॉक्टर आहेस का तू?...'

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

बस्स...प्रसाद आणि किरण मानें मध्ये जोरदार वाद रंगलेला दिसला अन् प्रेक्षकांची आजच्या भागाविषयीची उत्सुकता वाढलेली दिसून आली. तेव्हा पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT