Marathi actors- Prasad Jawade,Vishal Nikam, vivek Sangle, Tejaswini Lonari etc. Esakal
मनोरंजन

Marathi Serial: मराठी कलाकारांना लागली लॉटरी, इन्स्टाग्रामकडून मिळालं 'हे' गिफ्ट

मालिका विश्वातील तब्बल २० कलाकारांना सोशल मीडियानं हे स्पेशल गिफ्ट दिलंय त्याचा खुलासा नुकताच झाला आहे.

प्रणाली मोरे

Marathi Serial: आजकाल सोशल मीडिया हे माध्यम इतकं प्रभावी झालं आहे की सर्वसामान्य पब्लिकच नाही तर अख्खी मनोरंजन इंडस्ट्री यामागे वेडी आहे. चाहते आणि कलाकारांमधील मोठा दुवा सोशल मीडियाच आहे. इथे फॉलोअर्स वाढवण्यासाठी कलाकार मंडळी जिवाचा आटापिटा करताना दिसतात.

त्यासाठी वेगवेगळ्या हटके पोस्ट म्हणू नका, हॉट फोटोज म्हणून नका की चर्चेत येतील असे व्हिडीओ म्हणू नका खच्चून पोस्ट करताना दिसतात. अशा सोशल मीडियानं कलाकारांना गिफ्ट देणं ही मोठी गोष्ट आहे. चला कोणाला काय गिफ्ट मिळालंय इन्स्टाग्रामकडून ते पाहूया. (Marathi serial actors instagram gift blue tick)

मराठी कलाकारांना मिळालेलं हे गिफ्ट आहे 'ब्लू टिक'..म्हणजे काय बरं? चला जाणून घेऊया.

जर आपल्या सोशल मीडियावर अंकाऊन्टवर ब्लू टिक आली की तो आनंद वेगळाच असतो आपली ओळख वेगळी होते. मराठी कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर अक्टिव असतात आपल्या रोजच्या जीवनातील घडामोडी ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना देत असतात. आता चक्क वीस कलाकारांचे इंस्टाग्राम अंकाऊन्ट झाले आहेत व्हेरिफिकेशन.

हेही वाचा:  द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

आपल्या सोशल मीडियावररच्या अकाउंटवर जर एकदा ब्लू टिक आली की सोशल मीडियावर आपली खरी ओळख निर्माण होते. ब्लू टिक हे कोणत्याही सोशल अकाउंटची सत्यता दर्शवत असते. म्हणजेच, महत्त्वाच्या व्यक्तीचे ते खरे अकाउंट असल्याचा दाखला ही टिक दर्शवत असते. मराठी डेली सोप मधील काही कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही ब्लू टीक आता आली आहे.

गेल्या आठवड्यात अनेक मराठी सिरियल मधील कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफिकेशन झाले आहे.नुकतेच बिग बॉसच्या मराठी सिझन ४ मध्ये प्रसिद्ध झालेला प्रसाद जवादे, सर्वांची लाडकी तेजस्विनी लोणारी आणि गेल्या बिग बॉस मराठी सिझन ३चा विनर विशाल निकम यां तिघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लू टीक आली आहे.

इतकेच नव्हे तर 'आई कुठे काय करते' सिरियल मधील अभिषेक आणि अनघा म्हणजेच निरंजन कूलकर्णी आणि अश्विनी महांगडे यांचे देखील अकाऊंट व्हेरिफिकेशन झाले आहे. त्याशिवाय 'जीव माझा गुंतला' फेम मल्हार सौरभ चौगुले याचे देखील अकाऊंट व्हेरिफिकेशन झाले आहे. त्या शिवाय समीर परांजपे, अमेय बर्वे, विवेक सांगळे, श्वेता राजन , विजय आंदळकर अशी न संपणारी लिस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Rana Jagjit Singh Patil : भाजपाचे आमदार राणा पाटील यांचे विद्यमान आमदार व खासदार यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघात दौरे

SCROLL FOR NEXT