Titeeksha Tawde Interview, Zee Marathi...Satvya Mulichi Satavi Mulagi. Instagram
मनोरंजन

Marathi Serial: स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोट मधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क..

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तितिक्षा तावडेनं आपण अध्यात्मिक बनण्यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Titeeksha Tawde: अनेक मराठी मालिका,सिनेमे आणि त्यानंत 'शाब्बास मिथ्थू' सारख्या बॉलीवूडच्या सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली तितिक्षा तावडे सध्या झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून आपल्याला दिसत आहे. तिची नेत्रा ही भूमिका थोड्याच दिवसांत घराघरात आवडू लागली आहे. आतापर्यंत केवळ सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणारी तितिक्षा या मालिकेत मात्र सुपर वुमनच्या थाटात दिसत आहे.

आपल्या या भूमिकेविषयी भरभरून बोलताना तितिक्षानं सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत आपल्या अध्यात्मिक प्रेमाविषयी देखील बोलून दाखवलं आहे. आपण पहिल्यांदा अध्यात्मिक नव्हतो,मात्र अक्कलकोटच्या त्या एका अनुभवानं आपल्याला अध्यात्मिक बनवलं असा खुलासा तितिक्षा तावडेनं या मुलाखतीत केला आहे. तितिक्षाला प्रत्यक्ष आयुष्यात मिळालेला संकेतच जणू तिनं एक्सक्लुसिव्हली बोलून दाखवला आहे. मुलाखत बातमीत जोडली आहे,ती नक्की ऐका.

सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्रा ही तितिक्षानं साकारलेली व्यक्तिरेखा लोकांना भावतेय. ती साधीभोळी असली तरी तिला देवीचं अलौकीक वरदान मिळालेलं आहे ज्याचा ती गरजू लोकांसाठी वापर करताना दिसत आहे. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना तितिक्षानं श्रद्धा,भक्ती अशा अध्यात्माशी जोडलेल्या काही खास गोष्टींचा तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.

मालिकेतील पडद्यामागचे काही हटके अनुभव देखील तितिक्षानं शेअर केले आहेत. या मुलाखतीत तितिक्षानं तिला संकेत मिळतानाचा सीन नेमका कसा शूट होतो याचा मोठा खुलासा केला आहे. संकेत मिळताच तितिक्षाच्या कानामागून दरवेळेस विशिष्ट प्रकारे घाम गळतो त्यासाठी नेमकं काय केलं जातं याचा देखील मोठा खुलासा तितिक्षानं केला आहे. तेव्हा बातमीत वर जोडलेली तितिक्षाची पॉडकास्ट मुलाखत ऐकायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT