marathi serial trp rating latest update jui gadkari tharla tar mag serial first rank in trp race aai kuthe kay karte got second rank sakal
मनोरंजन

Marathi Serial TRP: जुई गडकरी ठरली पुन्हा नंबर १ ! ना आईला पुढे जाऊ देईना ना दीपाला..

'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत अव्वल; 'आई कुठे काय करते' दुसऱ्या क्रमांकावर..

नीलेश अडसूळ

Marathi Serial TRP update: अभिनेत्री जुई गडकरी 'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी स्तर प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत झळकली आहे. सुरवातीला जुईची एंट्री झाली तेव्हा ती मालिका कशी आणि किती चालेल याबाबत खात्री नव्हती.

एका अनाथ मुलीची आणि एका बड्या उद्योगपतीची प्रेमकहाणी टेलिव्हिजनवर आली आणि अल्पावधीतच हीट देखील झाली. अभिनेत्री जुई गडकरीचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की तिचे चाहते आवर्जून तीची मालिका पाहतात.

म्हणून या वाहिणीवरील भल्या भल्या आणि जुन्या मालिकांना मागे सारून जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका प्रचंड गाजते आहे. विशेष म्हणजे गेली तेरा आठवडे ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या आठवड्यातही या मालिकेला ६.८ रेटिंग मिळाली आहे.

(marathi serial trp rating latest update jui gadkari tharla tar mag serial first rank in trp race aai kuthe kay karte got second rank)

मालिका ह्या रटाळ असतात. असंही कुणीही कितीही बोललं तरी मालिकांची काही कमी झालेली नाही. आजही चांद्या पासून बांद्यापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. (Latest Marathi News)

गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे. या वाहिनीवरील आशय हा सर्वाधिक पाहिला जाणारा असून प्रेक्षकांची त्याला मोठी पसंती आहे. सध्या या वाहिनीच्या सगळ्याच मालिका रेकॉर्ड ब्रेक आकडे गाठत असून यंदाही याच वहिनीचा 'टीआरपी'वर दबदबा राहिला आहे.

तर यंदाही आईची पीछेहाट झाली असून 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. सध्या मालिकेतअनिरुद्धची बिजनेस पार्टनर 'वीणा'ची एंट्री झाली आहे. ती आशुतोषची बहीण असल्याने मालिकेत वेगळीच रंगत आली आहे. अनिरुद्ध आशुतोष आणि वीणा यांच्यात फुट पाडत आहे.

तर 'रंग माझा वेगळा' आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकानाही अनुक्रमे 6.1 रेटिंग मिळाले आहे. तर पाचव्या स्थानावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे. (Marathi Tajya Batmya)


तर 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे. तर त्या पाठोपाठ 'स्वाभिमान', 'सहकुटुंब सहपरिवार', 'स्वाभिमान', 'मन धागा धागा जोडते नवा' आणि 'अबोली' या मालिकांचा नंबर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT