shantit kranti  team esakal
मनोरंजन

गोव्यात जाऊन काय मिळणार?, 'शांतीत क्रांतीचा' ट्रेलर एकदा पाहाच

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे (ott platfom) वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आणि चित्रपट आपल्या भेटीला आले आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे (ott platfom) वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आणि चित्रपट आपल्या भेटीला आले आहेत. त्यात अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळण्यात आले आहेत. कोरोनामुळे एकीकडे मनोरंजन क्षेत्रावर आर्थिक संकट असताना दुसरीकडे ओटीटीनं कित्येक निर्माते आणि दिग्दर्शकांना मोठा मदतीचा हात दिला आहे. आशयपूर्ण आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडतील असे विषय निर्माते प्रेक्षकांपुढे सादर करत आहे. केवळ हिंदीतच नाहीतर मराठीमध्ये देखील हटक्या विषयांची मांडणी करणारे चित्रपट आणि मालिका समोर येत आहे. (marathi show shantit kranti bhartiy digital party new web series on sony liv yst88)

समांतर (samantar) नंतर सिटी ऑफ ड्रीम्सचे (city of dreams) प्रेक्षकांना वेध लागले आहे. ही मालिका मराठी बरोबरच हिंदीमध्ये देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मात्र सध्या एका शो च्या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे 'शांतीत क्रांती' च्या ट्रेलरची. सध्या हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. तो प्रेक्षकांच्या पसंतीसही पडला आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयाची मांडणी त्यात करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये असलेले संवाद खासकरुन तरुणांना आवडल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांपूर्वी दिल चाहता है हा फरहान अख्तरचा एक चित्रपट आला होता. त्यात तीन मित्रांची गोष्ट सांगितली होती. शांतीत क्रांतीमध्ये देखील तशाच प्रकारची गोष्ट आहे.

मित्रत्व, प्रवासाच्या माध्यमातून स्वताचा घेतलेला शोध. ही त्या शो ची मुख्य संकल्पना आहे. श्रेयस, प्रसन्न आणि दिनार अशी त्या मित्रांची नावे आहेत. आपण ज्यावेळी तो ट्रेलर पाहतो तेव्हा त्यातून त्यांची धमाल आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आखलेली गोव्याची ट्रीप ही त्यांच्या आयुष्याला लागणारं वळण आहे. याची पुसटशी कल्पना आपल्याला येते.

भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपानं या शो ची निर्मिती केली आहे. सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला भेटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT