song 
मनोरंजन

'ये दिन भी ढलेंगे' गाण्यातून देशवासीयांना धीर न सोडण्याचे कलाकारांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सगळेच लोक घरीच थांबून सोशल डिस्टंन्सिंग पाळत आहेत. देशभरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशातील करोना विषाणूचं संकट दूर करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, पोलिस हे आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. या काळात देशभरातील चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सर्व कलाकार कुटुंबासोबत आपला मौल्यवान वेळ घालवत आहेत. सर्वच कलाकार आपल्या घरी राहून सोशल डिस्टन्सिंग, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असे आवाहन करणारे व्हिडिओ शेअर करत आहेत. यातच अनेकांनी नवीन संकल्पना आणत त्यांचे आभार मानणारे पोस्ट शेअर केले आहेत. यात बॉलिवूड कलाकारांबरोबर मराठी कलाकारही डॉक्टर्स, नर्सेस पोलिस यांचे आभार मानण्यासाठी बरीच गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. यातच आणखी एक गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. टी-सीरिज हे गाणं घेऊन आलं आहे. 'ये दिन भी ढलेंगे' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यातून डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, पोलिस यांचे आभार मानले आहेत आणि जनतेला धीर न सोडण्याचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. 

या गाण्यातून देशवासीयांना कोरोनाच्या विरोधात लढण्याचे प्रोत्साहन दिले आहे. कोणतीही वेळ दीर्घकाळ टिकत नाही. सध्याचे वाईट दिवस जातील आणि नवी पहाट लवकरच सर्वांना पाहायला मिळेल असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. या गाण्यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, शरद पोंक्षे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, सुनील बर्वे, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक, स्मिता तांबे, भार्गवी चिरमुले, समृध्दी पोरे , मोहन आगाशे, भारत गणेशपुरे, आशिष चौगुले, विशाल पाटील, अशोक मुन्ने, समीर धर्माधिकारी आदी कलाकार झळकले आहेत. या गाण्याची निर्मिती टी-सीरिज ने केली आहे. हे गाणं समृध्दी पोरे यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. तर गायक स्वरूप भालवनकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

याशिवाय गायक सुदेश भोसले, स्वरूप भालवनकर गायिका वैशाली सामंत, जान्हवी प्रभू अरोरा, कीर्ती किल्लेदार यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं सर्व कलाकारांनी घरी राहूनच चित्रित केले आहे. याआधी बॉलिवूड कलाकार आणि मराठी कलाकारांनी देखील जनेतला आवाहन करणारी गाणी प्रेक्षकांसमोर आणली आहेत.  

marathi star share ye din bhi dhalenge encouraging song on coronavirus lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

SCROLL FOR NEXT