swapnil joshi and leena joshi sakal
मनोरंजन

लग्नाची गोष्ट : हॅपनिंग सहजीवनाची दशकपूर्ती!

छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत आपल्या अभिनयानं प्रत्येकाला मोहित केलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी.

स्वप्नील जोशी

छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत आपल्या अभिनयानं प्रत्येकाला मोहित केलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी.

छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत आपल्या अभिनयानं प्रत्येकाला मोहित केलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा प्रत्येक माध्यमातून आपल्या भेटीला येत त्यानं प्रेक्षकांशी घट्ट नातं तयार केलं आहे. त्याचं स्ट्रॉंग बॉण्डिंग आहे ते त्याची पत्नी लीनासोबत. लीना डेंटिस्ट आहे. त्यांच्या लग्नाला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली. लीना आणि स्वप्नील यांचं अरेंज मॅरेज, पण पहिल्याच भेटीत त्यांच्यात इतक्या छान गप्पा झाल्या की त्याचवेळी स्वप्नीलनं ठरवलं होतं लीना हीच आपल्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे. स्वप्नीलला भेटण्यापूर्वी तिनं त्याची कामं पाहिली नव्हती, पण त्यांच्या भेटीनंतर तिनं ‘स्वप्नील जोशी वीक सेलिब्रेट करत त्याचे सगळे चित्रपट पाहिले़!

स्वप्नील म्हणाला, ‘‘लीना खूप मनमिळाऊ आहे. ती नेहमी हसतमुख आणि सकारात्मक असते. ती माणसांना बांधून ठेवते, सगळ्यांबरोबर असलेलं नातं ती उत्तमप्रकारे जपत असते. ती सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाते. तिच्यातला हा गुण मला विशेष आवडतो. ती आमच्या कुटुंबात खूप छानप्रकारे मिसळली आहे. कामानिमित्त अनेकदा मला कौटुंबिक समारंभात भाग घ्यायला जमत नाही, पण लीना तिथं माझी उणीव भासू देत नाही. तिचा स्वभाव इतका चांगला आहे, की तिनं पटकन माझ्या घरच्यांना आपलंस केलंय. माझ्या आई-बाबांची ती खूप छान काळजी घेते. आमची मुलं राघव-मायराचं आणि लीनाचं बॉण्डिंगही खूप मस्त आहे. त्यामुळं कामावर जाताना मला कोणतीही काळजी नसते. ती छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेते. भविष्याचा विचार करावा पण त्याचं दडपण आज न घेता आजचा दिवस आपण मजेत जगला पाहिजे, हे तिने मला शिकवलं. तिच्यामुळं माझं आयुष्य हॅपनिंग झालं. आपल्या रोजच्या रुटीनमधून वेळ काढत कधी आम्ही सिनेमाला जातो, शॉपिंगला जातो, लॉन्ग ड्राईव्हला जातो. आम्हा दोघांनाही चित्रपट बघायला, फिरायला जायला, जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात. लीना माझी बायको आहेच, पण तितकीच चांगली ती मैत्रीणही आहे.’’

लीना म्हणाली, ‘‘स्वप्नील खूप गोड स्वभावाचा मुलगा आहे. तो अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता आहे, पण त्याला या गोष्टीचा अजिबात गर्व नाही. तो समोरच्या व्यक्तीला पटकन कंफर्टेबल करतो. त्यामुळं त्याच्याशी बोलताना कधीही कोणाला दडपण येत नाही. त्याच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो खूप जीव लावतो. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी त्याची छान मैत्री होते. सगळ्यांशी तो उत्तमप्रकारे गप्पा मारू शकतो. तो स्वच्छताप्रिय आहे. त्याला सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आणि जगच्या जागी लागतात. त्याच्यामुळं मलाही स्वच्छतेची आवड लागली आहे. कामाच्या बाबतीत तो खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे. शूटिंगवरून घरी आल्यावर तो त्याचा सगळा वेळ घरच्यांना देतो. माझ्याशी, आई-बाबांशी गप्पा मारतो, मुलांशी खेळतो. राघव आणि मायरा म्हणजे स्वप्नीलचा जीव की प्राण. त्यांच्या बाबतीत तो भावनिक आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तो त्यांचं सगळं आनंदानं करत आला आहे. स्वप्नीलनं केलेली सगळी कामं मी पाहिली आहेत. त्यापैकी ‘मुंबई पुणे मुंबई २’मध्ये त्याने साकारलेला गौतम मला विशेष भावला. खऱ्या आयुष्यातही स्वप्नील हा गौतमसरखा आहे. सगळ्यांची काळजी घेणारा, आपल्या आई बाबांचा विचार करणारा. स्वप्नील जितका चांगला चांगला नवरा आहे, तितकाच चांगला तो एक मुलगा आणि वडीलही आहे.’’

आता लवकरच स्वप्नील जोशी ''1 ओटीटी'' हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या भेटीला घेऊन येत आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ''1 ओटीटी''च्या लोगोचं अनावरण झाले. त्याच्या या नवीन व्हेंचरबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, ‘‘भारत ही ओटीटीसाठी एक मोठीच बाजारपेठ आहे, ही बाब गेल्या दोन वर्षांमध्ये सिद्ध झाली आहे. मात्र प्रादेशिक भाषांना या व्यासपीठांवर म्हणावे तसे प्रतिनिधित्त्व मिळत नव्हते. ते मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘1 ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणण्याचे ठरविले. गेली दोन वर्षे मी ‘ओटीटी’ सुरू करण्याचे ठरवत होतो. एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करणे आणि लोकांना काहीतरी वेगळे देणे, हा त्यामागील हेतू होता. मी, नरेंद्र फिरोदिया आणि ४-५ सहकारी मिळून हा प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत. त्यानुसार २०२२च्या पहिल्या तीन महिन्यात ‘1 ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT