Matthew Perry Passed Away Esakal
मनोरंजन

RIP Matthew Perry: फ्रेंड्स फेम मॅथ्यू पेरीच्या निधनाने कलाकार शोकसागरात बुडाले! वाहिली श्रद्धांजली

Vaishali Patil

Matthew Perry Passed Away: हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अमेरिकन-कॅनेडियन अभिनेते आणि कॉमेडियन मॅथ्यू पेरी याचे निधन झाले आहे. सिटकॉम 'फ्रेंड्स' या मालिकेने प्रसिद्ध झालेला मॅथ्यूचे वयाच्या ५४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मॅथ्यूचा मृतदेह त्याच्या घरी संशयास्पद अवस्थेत बाथ टपमध्ये सापडला आहे.

मॅथ्यूच्या निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. वृत्तानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याचे चाहते आणि कलाकार सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत श्रद्धांजली वाहत आहेत.

केवळ हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्याच्या देखील निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. ज्यात रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी आणि इतर बॉलीवूड कलाकारांचा सामावेश आहे.रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मॅथ्यूचा फोटो शेअर केला आहे.

Bollywood grieves the death of Matthew Perry.
Bollywood grieves the death of Matthew Perry.
Bollywood grieves the death of Matthew Perry.
Bollywood grieves the death of Matthew Perry.

सामंथा रुथ प्रभूने देखील मॅथ्यू पेरीला आरआयपी केले आहे. सोनी राझदानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर याला "दुःखद बातमी" म्हटले आहे.

सोफी चौधरीने X वर पोस्ट करत लिहिले, “ सकाळी उठल्यानंतर सर्वात वाईट बातमी समोर आली.. आम्हाला हसण्याबद्दल आणि तुमच्या प्रतिभेबद्दल धन्यवाद #matthewperry .. जगाने एक रत्न गमावले असले तरी तुम्ही शांततेत राहा.”

तर मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील पोस्ट शेयर करत मॅथ्यू पेरीला श्रद्धांजली वाहिली आहे. चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी बरोबरच सोनाली कुलकर्णीने सोशल मिडियावर मॅथ्यूचा फोटो शेयर केला आहे.

चिन्मय त्याच्या पोस्टमध्ये लिहितो की, "मला जॉयसारखे वाटत आहे. मॅथ्यू पेरी तुझी खुप आठवण येईल. आम्हाला ‘चँडलर’ दिल्याबद्दल धन्यवाद." अमृता देशमुखने देखील सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : स्कॉटलंडच्या समावेशानंतर वेळापत्रकात बदल? भारतीय संघ मुंबईत दक्षिण आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या तारीख...

Crime News : लग्नास नकार, महिलेने सुडातून एक्स बॉयफ्रेंडच्या पत्नीला टोचले एचआयव्हीचे इंजेक्शन, 'असा' झाला खुलासा

Republic Day Sale: वॉव! प्रजासत्ताक दिनानिमित्त 'या' ब्रॅण्डवर आहे मोठी सूट, कपड्यांवर 70 टक्के डिस्काऊंट

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मुलगा निघाला 'लफडेबाज'; घरकाम करणाऱ्या महिलेवर जबरदस्ती अन् नंतर...

Latest Marathi news Live Update : शूटिंगच्या नावाखाली तरुणीची फसवणूक

SCROLL FOR NEXT