मनोरंजन

'या सगळ्या गोष्टी बघून फक्त त्रास होतो,' गौतमी देशपांडेची विचार करायला लावणारी पोस्ट

सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओसंदर्भात गौतमीची पोस्ट

स्वाती वेमूल

'माझा होशील ना' Maza Hoshil Na मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडेने Gautami Deshpande सोशल मीडियावरील पोस्टसंबंधी तिचं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर एखादा संवेदशनशील व्हिडीओ, फोटो किंवा मजकूर पोस्ट करताना एकदा विचार करण्याचं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे. इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये गौतमीने तिचं हे मत मांडलंय. (Maza Hoshil Na fame Gautami Deshpande urges netizens to be sensitive while sharing posts on social media)

गौतमी देशपांडेची पोस्ट-

'हल्ली एकूणच सगळ्यांना काय झालंय कळत नाहीये. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचे फोटोज शेअर करणे, त्यांच्या फॅमिलीचे रडतानाचे फोटो शेअर करणं हे गरजेचा आहे का? एखादा एक्सीडेंट झाल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज शेअर करणं खरंच गरजेचं आहे का? या सगळ्या गोष्टी बघून फक्त त्रास होतो. कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलंय त्यांना हे असं सगळं बघून त्रास होऊ शकतो हा विचार का केला जात नाही? खरोखरंच आपल्याला आपलं थिंकिंग आता बदलायची गरज आहे. पटतंय ना?', अशी पोस्ट गौतमीने केली.

gautami

सोशल मीडियावर सक्रिय असलेली गौतमी तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. याच माध्यमाचा उपयोग तिने काही तिचे विचार मांडण्यासाठीही केला आहे. गौतमी सध्या झी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिची आणि अभिनेता विराजस कुलकर्णीची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT