Shital Kshirsaagar, Shital Kshirsaagar news, Shital Kshirsaagar video, mazi tuzi reshimgath,  SAKAL
मनोरंजन

Shital Kshirsaagar: आधी हाताला चटके.. माझी तुझी रेशीमगाठ मधील अभिनेत्रीने चुलीवर थापली भाकर

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शीतल झळकल्या

Devendra Jadhav

Shitaal Kshirsaagar Video News: मराठमोळी अभिनेत्री शीतल क्षीरसागर या मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. शीतल यांनी आजवर अनेक मालिकांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या.

काहीच महिन्यांपूर्वी ऑफ एअर गेलेल्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शीतल झळकल्या. शीतल यांनी या मालिकेत सिम्मीची खलनायकी भूमिका साकारली. मालिका संपली तरीही शीतल यांची चर्चा अजून सुरूच आहे.

(mazi tuzi reshimgath serial fame shital kshirsagar made bhakari at chul in her villege video viral)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शीतल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत शीतल क्षीरसागर या ताटात तांदळाची भाकरी थापत आहेत.

पुढे शीतल भाकरी चुलीवर ठेवत पलेताच्या साहाय्याने ही भाकरी शेकवत आहेत. फायनली चुलीवरची तांदळाची भाकरी..

जेव्हा तुमच्या आजूबाजूला एक्सपर्ट लोकांचे सल्ले असतात तेव्हा काहीही अशक्य नसतं. मी पहिल्यांदाच बनवलं पण करून दाखवलं.. अशा भावना शीतल यांनी व्यक्त केल्या आहेत.

"किती छान बनवलं आहेस.. छान मेहनत घेतली आहेस..", "तोंडाला पाणी सुटले शितलताई.. कधी येऊ भाकर खायला..", "तांदळाची भाकरी आणि चिकन रस्सा काय combo आहे..",

"माझी तुझी रेशीमगाठ २ मध्ये सिम्मी चोधरी यांच्यावर चुलीवरच जेवण बनवण्याची वेळ येणार ........" अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी शीतल यांच्या तांदळाची भाकरी बनवण्याच्या प्रयत्नाला दाद दिली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ नंतर शीतल सध्या कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेत झळकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

Pune Crime : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 'कुरकुरे' देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा वाद विकोपाला! मराठा बांधवांची अलोट गर्दी; राज्यभरातून घटनेचा निषेध

SCROLL FOR NEXT