shanaya 
मनोरंजन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून होणार 'या' अभिनेत्रीची एक्झिट?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका यातील काही खास पात्रांमुळे घराघरात पोहोचली. मग ती राधिका असो गुरु असो किंवा मग स्टायलिश शनाया. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रेक्षकांसाठी यात अनेकदा ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. असाच एक ट्विस्ट आता पुन्हा एकदा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. चाहत्यांसाठी एक बातमी म्हणजे आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटलं जात आहे.

मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारलं होतं. तिची भूमिका आणि स्टाईल प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली होती. त्यानंतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकारली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रेक्षकांनी मात्र शनायाच्या एक्झिटविषयी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. तेव्हा शनाया हे पात्रंच निघून गेल्यानंतर मालिका कोणत्या वळणावर येऊन पोहोचणार हेच पाहायचंय. 

mazya navryachi bayko fame shanaya aka rasika sunil exit the show again  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT