MC Stan Video Esakal
मनोरंजन

MC Stan Video: जेव्हा क्रिकेटचा देव अन् रॅपिंगच्या किंगमध्ये होते क्रिकेटची जुगलबंदी ... चर्चा तर होणारच..!

Vaishali Patil

MC Stan Video: एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्या बॉलीवुड सेलेब्रिटींनाही मागे टाकले आहे. त्याच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावणे हे जरा कठिणचं आहे. रॅपर एमसीची क्रेझ ही चाहत्यांमध्ये प्रचंड आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर रॅपर घराघरात नाव बनले आहे. एमसी आता कुठेही गेला तरी तिथे त्याची हवा आहे.

सध्या सोशल मिडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता त्याचा प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकरसोबतचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सचिनसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहिल्यानंतर स्टॅनचे चाहते खुपच खुश आहेत. त्याचे चाहते याला 'एपिक मोमेंट' म्हणत आहेत.

दरम्यान, एमसी स्टॅन त्याचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळताना दिसला. गुरुवारी एमसी स्टेनने त्याच्या एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तो क्रिकेटचा देव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

यावेळी स्टॅन ऑल-ब्लॅक आउटफिट आणि काळ्या चष्म्यांसह गोलंदाजी करताना दिसला आणि त्याचवेळी व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना दिसत आहे.

सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने साधा लाल शर्ट आणि क्रीम पॅन्ट घातली होती. एमसी स्टॅनने नंतर क्रिकेटपटूसोबतचे फोटोही पोस्ट केले आणि त्यांना कॅप्शन दिले, 'दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत गोलंदाजी. क्रिकेटचा देव. खूप कृतज्ञ. हक से #50forsachin'

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांचे चाहते खुप खुश आहेत. त्यांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे. चाहते कमेंट्सद्वारे दोघांचे कौतुक करत आहेत.

काही दिवसांपुर्वी टेनिस स्टार सानिया मिर्झाने एमसी स्टेनला महागडे गिफ्ट दिले होते. ज्यासाठी रॅपरने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून तिचे आभार मानले आहेत. ज्यांची किंमत खुपच होती. सानिया मिर्झाने त्याला 30,000 रुपये किमतीचा बालेंसियागा सनग्लासेस आणि 91,000 रुपये किंमत असलेल्या शूज स्टॅनला भेट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT