sanya abhimanyu 
मनोरंजन

अभिनेत्री भाग्यश्रीच्या मुलासोबत सन्या मल्होत्रा करतेय लग्न?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘मैने प्यार किया’ सिनेमातील अभिनेत्री भाग्यश्री सध्या खूपंच चर्चेत आहे. ब-याच वर्षांनी तिने बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे. आता तर तिचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि दंगल गर्ल अभिनेत्री सन्या मल्होत्रा लग्न करणार आहेत. पण हे खरंखुरं लग्न आहे की आणखी काही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

अभिनेत्री भाग्यश्री आता चर्चेत आलीये ती तिच्या मुलामुळे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु आणि अभिनेत्री सन्या मल्होत्रा एका सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ असं या सिनेमाचं नाव असून यामध्ये अभिमन्यू आणि सन्या मुख्य भूमिका साकारत आहेत. हा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. विवेक सोनी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

या सिनेमात अभिमन्यु आणि सन्या यांच लग्न आहे. आयुष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या मदुराईतील एका तरुण जोडप्याची ही कहाणी आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला असून यामध्ये सन्या आणि अभिमन्यू वधू-वराच्या वेशभूषेत पाहायला मिळतायेत. तमिळ वधूप्रमाणे सन्याने कांजीवरम साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने घातले आहेत. तर अभिमन्यूने वेष्टी आणि अंगवस्त्रम परिधान केलंय.

अनुराग बासूच्या ‘ल्युडो’ या सिनेमानंतर सन्याचा हा दुसरा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय. तर अभिमन्यूचा हा पहिलाच सिनेमा आहे. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. मात्र या सिनेमाच्या रिलीजची तारीख अजुनही जाहीर करण्यात आलेली नाही.  

meenakshi sundareshwar first look sanya malhotra abhimanyu dassanis south indian wedding  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT