meera joshi buy new home in pune marathi actress  SAKAL
मनोरंजन

Meera Joshi: मराठमोळ्या मीरा जोशीने पुण्यात घेतलं नवीन घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

मीराच्या नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Devendra Jadhav

Meera Joshi News: मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय. मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री प्राजक्ता माळीने काहीच दिवसांपुर्वी कर्जतला स्वतःचं नवीन घर घेतलं.

आता प्राजक्ता नंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने स्वतःचं आलिशान घर घेतलंय. ही अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. मीरा जोशीने पुण्यात स्वतःचं घर विकत घेतलंय. मीराच्या नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

(meera joshi buy new home in pune marathi actress)

मीराचा नवीन घरात गृहप्रवेश

मीराने सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केलेत. या फोटोत मीराचा भाऊ सलील जोशी, आई स्मिता जोशी आणि तिचे बाबा दिसत आहेत.

मीराने पुण्यातील नवीन घरात पुजा करत गृहप्रवेश केलाय. मीराच्या हातात कलश दिसुन येतोय. नवीन घर घेतल्याने मीरा आणि तिचं संपूर्ण कुटुंब खुप आनंदात आहे.

मीराने केला होता बॉयफ्रेंडचा खुलासा

मीरा काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आपण प्रेमात पडल्याचं तिने सांगितलं आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. या फोटोत समुद्रकिनाऱ्यावर उभे आहेत. तर तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा आहे. तिने त्याचा चेहरा दाखवला नसल्याने तो नेमका कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

मीराने उरण समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या प्रियकराचा चेहरा आणि नाव गुदस्त्यात ठेवलं असलं तरी चाहते तिच्यासाठी प्रचंड आनंदी आहेत.

काही दिवसांपुर्वी झालेला मीराचा अपघात

अभिनेत्री ऋतुजा बागवे, मेघना एरंड अशा अभिनेत्रींनी मीराचं अभिनंदन केलंय. मीराने ही उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे.

अभिनेत्री मीरा जोशी हिचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गवार अपघात झाला आहे. या संदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मिडियावर पोस्ट सह शेयर करत माहिती दिली आहे.

या अपघातात अभिनेत्रीला फारशी इजा झाली नसली तरी तिच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. तिची गाडी दुभाजकावर धडकल्याने गाडीला जबर फटका बसला आहे. अभिनेत्रीने गाडीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेयर करत या अपघताची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT