megha ghadge share memory of laxmikant berde inn the marathi movie pachadlela SAKAL
मनोरंजन

Laxmikant Berde: "आयुष्यातला विचित्र योगायोग", लक्ष्यामामांची आठवण काढून मेघा घाडगेने सांगितली आठवण

लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेने लक्ष्यामामाची खास आठवण शेअर केलीय

Devendra Jadhav

Megha Ghadage on Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली की आजही चेहऱ्यावर हसु येतं. लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळुन हसवतात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण दर्दी रसिकांना हटकुन येतेच. अशातच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेली मेघा घाडगे यांनी लक्ष्म्यामामांची खास आठवण शेअर केलीय.

(megha ghadge share memory of laxmikant berde in the marathi movie pachadlela)

मेघा घाडगेंनी सोशल मीडियावर 'पछाडलेला' सिनेमातला फोटो शेअर करुन लिहीलंय की,आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात... आज लक्ष्या मामांचा बर्थडे! खरंतर आजही, जवळजवळ १९ वर्षानंतर वाटत राहतं, अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील, "महेशला (महेश कोठारे) कॉल कर आत्ताच्या आत्ता.."

मेघा शेवटी लिहीतात, "माझ्या आयुष्यातला पहिला रिलिज्ड सिनेमा आणि 'द लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा शेवटचा रिलिज्ड सिनेमा एकच असणं याचं शल्य काय असू शकतं, याची कल्पना कुणालाही असण्याची शक्यता नाही. लहानपणी ज्यांचं कॉमेडी टायमिंग पाहून मी मोठे झाले, ज्यांचं इम्प्रोव्हायजेशन आजही अचाट करणारे वाटतात आणि मुळात ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला खळखळून हसवलं त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा, कलेच्या प्रांगणातला एक समृद्ध अनुभव होता.

हॅप्पी बर्थडे लक्ष्या मामा! We all miss you... तुमच्या अजरामर कामांतून, कलाकृतींमधून, अफाट परफॉर्मन्स मधून तुम्ही आजही आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात Alive आहात!"

मेघा यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत पछाडलेला सिनेमात अभिनय केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT