meghan markle 
मनोरंजन

"मुलाच्या वर्णावरून राजघराणं होतं चिंतेत"; मेगन मार्कलचे मुलाखतीत धक्कादायक खुलासे 

स्वाती वेमूल

ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांनी प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सूत्रसंचालिका ओप्रा विनफ्रेला दिलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत मेगनने ब्रिटनच्या राजघराण्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. मेगनने ब्रिटीश मीडियाच्या नकारात्मक कव्हरेजसह केट मिडलटनबाबत असलेल्या अफवांवरही स्पष्टीकरण दिलं. राजघराण्यात असूनदेखील एकटं वाटत असल्याचं तिने मुलाखतीत बोलून दाखवलं. इतकंच नव्हे तर मुलाच्या वर्णावरूनही राजघराण्यात चिंता होती, असा खुलासाही तिने केला. 

"माझ्या मुलाच्या वर्णावरून राजपरिवारातील सदस्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. याविषयी कुटुंबातल्या सदस्यांनी प्रिन्स हॅरीशी चर्चादेखील केली होती", असं ती म्हणाली. मात्र त्या सदस्यांची नावं सांगण्यात तिने नकार दिला. शाही परिवारातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सुरक्षाही नाकारली होती, असंही तिने स्पष्ट केलं. 

"एकवेळ अशी आली होती, की मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. माझ्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता. सोशल मीडियावर माझ्याविषयी आपत्तीजनक कमेंट्स केल्या जात होत्या", असं मेगनने सांगितलं. अशा प्रसंगी काय करावं आणि मेगनची मदत कशी करावी हे समजत नसल्याचं प्रिन्स हॅरीनं सांगितलं. 

मेगनच्या या मुलाखवतीवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय महाराणी एलिजाबेथ यांनी घेतला आहे. 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, शाही स्टाफने मेगन-हॅरीची ही मुलाखत पाहिली आणि त्याबद्दल त्यांनी शाही परिवाराला सांगितलं. त्याचप्रमाणे महाराणीने प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्स विलियम्स यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. 

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे दुसऱ्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या शाही जोडप्याला याआधी दीड वर्षाचं एक अपत्य असून त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर असं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT