Holi trend in Bollywood Esakal
मनोरंजन

Holi in Bollywood: खानसाहेबांनी रिस्क घेतली आणि पहिल्यांदाच बॉलीवूडच्या पडद्यावर झळकली होळी! अन् आता..

सकाळ डिजिटल टीम

मार्च महिना सुरु होताच उत्सुकता लागते ती होळी सणाची. हा सण लहांनापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतिने खेळला जातो. कुठे रंगपचंमी तर कुठे धुलिवंदन..या वर्षी होळी 8 मार्चला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल. सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात.

आपल्याकडे होळीची अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये होळी खेळताना दाखविण्यात आले आहे. बॉलीवूड इंडस्ट्री आणि होळी यांचे खूप घट्ट नाते आहे. अनेक चित्रपटात होळी साजरी करतांनाचे सीन्स आपण पाहिले आहेत. मात्र चित्रपटांमध्ये होळीचा ट्रेंड कसा सुरू झाला आणि तो कोणी सुरु केला? हे जाणुन घेऊयात

बॉलीवूडमध्ये ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाच्या काळापासून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 'औरत' हा चित्रपट स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1940 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये होळीचा सण पहिल्यांदाच दाखवण्यात आला होता, परंतु हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असल्यामुळे या चित्रपटात खरे रंग पाहायला मिळाले नाहीत.

हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. 1957 मध्ये मेहबूब खान यांनी 'औरत' चित्रपटाचा रिमेक बनवला, ज्याचे नाव मदर इंडिया होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला अजुनही हा चित्रपट लोकप्रिय आहे.

होळीचे रंग रंगीबेरंगी पडद्यावर फक्त मेहबूब खानच्या 'मदर इंडिया' या चित्रपटात दिसले. नर्गिस, राजेंद्र कुमार, सुनील दत्त सारखे स्टार्स मदर इंडियामध्ये दिसले होते.

मदर इंडियाच्या आधीही रंगीत पडद्यावर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यापैकी मेहबूब खान यांचा एक चित्रपट होता, ज्याचे नाव आन होते. या चित्रपटात दिलीप कुमार, निम्मी, नादिरा आणि प्रेमनाथ सारखे कलाकार दिसले. हा चित्रपट 1952 साली प्रदर्शित झाला होता आणि मेहबूब खान यांनी या चित्रपटात होळीचा सीन दाखवला होता.

बॉलीवूडमध्ये होळीचा ट्रेंड सुरू करण्यात मेहबूब खान यांची फार महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मेहबूब खान यांच्यामुळे आज चित्रपटांमध्ये होळीचे रंग पाहायला मिळतात. आजही चित्रपटात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा होताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT