मनोरंजन

शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

आर्यन खान (aryan khan) प्रकरण किंग खान शाहरुखसाठी (king khan shahrukh khan) मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - आर्यन खान (aryan khan) प्रकरण किंग खान शाहरुखसाठी (king khan shahrukh khan) मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेनं वेगळं वळण घेतलं आहे. आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यात आता काही राजकीय नेत्यांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात एक नाव जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे आहे. त्यांनी शाहरुखला पाठींबा देत त्याच्या बाजूनं एक वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागल्याचे दिसून आले आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे.

एनसीबीनं आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यासगळ्या परिस्थितीत मेहबुबा मुफ्ती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईमागे त्याचे आडनाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या या प्रकारच्या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. याविषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी तक्रारदार वकीलानं केली आहे. जाणीवपूर्वक एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. एका राजकीय पक्षाची ही मतांसाठीची खेळी आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.

यावर मुफ्ती यांच्यावर दोन समुहांमध्ये वाद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केला गेली आहे. याप्रकरणावर एका दिल्लीतील वकीलानं मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून शाहरुख आणि आर्यन खान चर्चेत आले आहे. आर्यन खानला एनसीबीनं अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यत शाहरुखला बॉलीवूडमधून देखील मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला आहे. त्याला अनेक सेलिब्रेटींनी सपोर्ट करत आर्यन खानप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

इंडिया टूडेनं दिलेल्या एका वृत्तानुसार, तक्रारदारानं असं म्हटलं आहे की, जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलेलं वक्तव्य खेदजनक आहे. त्यामुळे दोन समुहांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. मुफ्ती यांनी एका राजकीय पक्षानं आपल्या स्वार्थासाठी अशाप्रकारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एका विशिष्ट समुहाच्या लोकांना लक्ष्य केलं जात असल्याचे म्हटले आहे. मुफ्ती यांच्या त्या वक्तव्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You India! लिहीत इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

जाऊ द्या ना काका... ! तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवले? Video Viral

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

SCROLL FOR NEXT