Met Gala 2023  esakal
मनोरंजन

Met Gala 2023 : बाबो! मेट गालात प्रियंकानं घातलं होतं 204 कोटींचं नेकलेस, खासियत वाचूनच व्हाल अवाक

तिच्या जबरदस्त डायमंड नेकलेसची खासियत अन् लूक बघून तुमची झोप उडू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Met Gala 2023 : मेट गाला 2023 सुरू झाला आहे आणि जगभरातील सितारे रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशनचा जलवा दाखवण्यास अगदी तयार आहेत. ग्लोबल स्टार, हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा देखील तिचा पती निक जोनाससोबत मेट गालामध्ये पोहोचली आणि दोघांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी फॅशन नाईटची थीम 'कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी' आहे, ही होऊन गेलेल्या प्रसिद्ध डिझायनरचा अविस्मरणीय क्षणांच्या स्मरणार्थ असणार आहे. प्रियांकाच्या स्लिट गाऊनने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, तर तिच्या जबरदस्त डायमंड नेकलेसची खासियत अन् लूक बघून तुमची झोप उडू शकते.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी यावेळी मेट गाला 2023 साठी काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे ट्यूनिंग केलेले दिसतेय, हा लूक त्यांनी लक्झरी फॅशन हाउस व्हॅलेंटिनोमधून निवडलाय. या लव्ह बर्ड्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियंकाने परिधान केलेल्या हाय स्लिट गाऊनने व निकच्या क्लासी सूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रियंकाच्या या गाऊनला प्लंजिंग स्क्वेअर नेकलाइन दिली गेली होती. ज्याला एक प्रकारे ऑफ शोल्डर पॅटर्नसुद्धा म्हटलं जाऊ शकतं. तर वेस्ट साइडला एका बाजूने बो लाइन डिझाइन दिलेली आहे. तिच्या या गाऊनमध्ये प्रियंका तिची कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसतेय.

प्रियंकाच्या डायमंड नेकलेसने मात्र सगळ्यांची झोप उडवली

प्रियंकाच्या संपूर्ण लुकमध्ये सर्वात आकर्षक ठरलं ते तिचं डायमंड नेकलेस. हे डायमंड नेकलेस 11.6 कॅरेटचं आहे. हे नेकलेस तिने बुलगारी ब्रँडकडून पिक केलंय. या नेकलेसमध्ये फार महागडा हिरा जडलेला आहे. रिपोर्ट्सनुसार या नेकलेसची किंमत 25 मिलीयन डॉलर आहे. भारतीय किंमतीनुसार हे नेकलेस तब्बल 204 कोटींचं आहे.

प्रियंकाच्या नेकलेसच्या किंमतीबाबत हे ट्विट व्हायरल होतेय

प्रियंका आणि निकचा ट्यूनिंग लूक

प्रियंकासह निक ब्लॅक ओव्हरसाइज्ड ब्लेजर आणि स्ट्रेट पँटमध्ये दिसला. दोघांच्याही लूकची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा दिसून येते. (Met Gala 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT