Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: नाद करा पण इतका! मॅच मुंबई अन् चेन्नईची मात्र चर्चा गौतमीचीच...

सकाळ डिजिटल टीम

सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार. कारण ते नाव सध्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरल आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या कार्यक्रमामुळे तर कधी तिच्यावर कोणी केलेल्या वक्तव्यामुळे. गौतमीचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात.

तिच्या कार्यक्रमात नेहमीच काहीतरी राडा होतो आणि त्याची बातमीही येतेच. तिच्या टिका करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मग ते लावणी कलाकार असो किंवा इंदुरीकर महारांजासारखे प्रसिद्ध महाराज. नुकतच त्यानींही तिच्यावर वक्तव्य केलं आणि त्याची बरिच चर्चा रंगली.

पण आता गौतमीची चर्चा ही वेगळ्या कारणाने रंगली आहे. ती म्हणजे आयपीएलमुळे. देशभरात आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळत आहे.

अशातच हा फिव्हर गौतमी पाटील वरही चढला होता. नुकतच गौतमीनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की आवडता क्रिकेटर कोणता तर तिनं झटक्यात एमएस धोनी हे नाव घेतलं.

मात्र ज्यावेळी मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग असा प्रश्न विचारला तेव्हा गौतमीनं मला मुंबई इंडियन्स आवडते असं सांगितलं.

आता गौतमीची आवडती टिम ही मुंबई इंडियन्स आहे म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आता तर कहर झाला. काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग यांच्यात लढत झाली.

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने शनिवारी आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्सवर ७ विकेट व ११ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र या मॅच दरम्यान आपल्या लाडक्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी झळकवल्या जाणाऱ्या पोस्टरमध्ये एका पठ्यानं थेट गौतमीच्या नावाचचं पोस्टर झळकवलं.

गौतमीच्या या पोस्टरमध्ये गौतमीच्या फोटोसोबत 'सबसे कातिल गौतमी पाटील' असं लिहिलं होत. हा सामना तर मुंबई इंडियन्स हारली मात्र काहीकाळ स्डेडिअममध्ये गौतमीची चर्चा मात्र रंगली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT