मनोरंजन

Michael Jackson ला पडली होती बप्पीदांच्या आवाजाची भुरळ, 'जिम्मी जिम्मी' गाणे आवडीचे

स्वत: बप्पी लाहिरी यांनीच कपील शर्मा शोमध्ये याचा खुलासा केला होता

सकाळ डिजिटल टीम

१९९६ साली मायकल जॅक्सन शो साठी पहिल्यांदाच भारतात आला होता. तेव्हा मायकल अनेकांना वैयक्तिक भेटला होता. मायकलने माझे नाव विचारले. मी लगेच माझे नाव सांगून डिस्को डान्सर गाणे गायला सुरू करणार होतो, पण इतक्यात तो म्हणाला, मला तुझे जिमी जिमी गाणे खूप आवडते.

लोकप्रिय संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी(६९) यांचे आज निधन झाले. ८० च्या दशकात त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी (Songs) निर्माण करून आपली ओळख तयार केली. बप्पी लाहिरी यांनी बंगाली चित्रपट दादू(१९७२) पासून आपल्या करियरची सुरूवात केली. शिकारी (१९७३) या चित्रपटापासून हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ताहिर हुसैन यांच्या जख्मी(१९७५) या हिंदी चित्रपटातील गाणी तर लोकांच्या पंसतीस उतरली. त्यांची डिस्को म्युझिक असलेली गाणी जगभरातल्या लोकांना आवडली. जगप्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनही त्यांच्या गाण्याचा चाहता होता.

स्वत: बप्पी लाहिरी यांनीच कपील शर्मा शोमध्ये याचा खुलासा केला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दांची गाणी ऐकली होती. १९९६ साली मायकल जॅक्सन शो साठी पहिल्यांदाच भारतात आला होता. तेव्हा मायकल अनेकांना वैयक्तिक भेटला होता. मी पण तिथेच बसलो होतो. त्याची नजर माझ्या गळ्यातल्या गणपतीच्या सोन्याच्या साखळीवर पडली. त्याला ती खूप आवडली. मायकलने माझे नाव विचारले. मी लगेच माझे नाव सांगून डिस्को डान्सर गाणे सुरू करणार होतो पण इतक्यात तो म्हणाला, मला तुझे 'जिम्मी जिम्मी' गाणे खूप आवडते. त्यावेळी मला खूप आनंद झाला. एवढा मोठा माणूनस मला आणि माझ्या गाण्यांना चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो हेच सुखावह होते. असेही बप्पीदांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

SCROLL FOR NEXT