Mika Singh Gift For His Bestfriend:  Esakalk
मनोरंजन

Mika Singh: दिलदार मिका! मित्राला वाढदिवशी दिले इतक्या कोटींचे दोन फ्लॅट्स

Vaishali Patil

Mika Singh Gift For His Bestfriend: मिका सिंग हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्यानं आता पर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. मिका सिंग हा नेहमीच चर्चेत असतो.

कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे मिकाची चर्चा नेहमीच रंगते. 'यारों का यार' म्हणुन त्याला ओळखलं जातं. अन् त्याला असं का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्याने असं काही केलं आहे की त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

मिका सिंगने वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्राला भारी असं गिफ्ट दिलं आहे. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मिकाचा खास मित्र कंवलजीत सिंगचा नुकताच वाढदिवस होता. त्याला वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन मिकाने मुंबई आणि दिल्लीत करोडो रुपयांचे दोन बंगले गिफ्ट केले आहेत अशी बातमी समोर आली आहे.

कंवलजीत हा मिका सिंगचा बालपणीचा मित्र आहे. मिकाने त्याला दिल्लीत ४ कोटी रुपयांचा फ्लॅट आणि मुंबईत ४ कोटी रुपयांचा फ्लॅट भेट दिला आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यानंतर नेटकरी मिका सिंगचे जोरदार कौतुक करत आहेत.

मिकाने हे पहिल्यांदाच केलेलं नाही तर यापुर्वी देखील मिकाने आपल्या मित्राला मर्सिडीज गिफ्ट केली होती. ज्याची किंमत 80 लाख रुपये असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला आहे आता पुन्हा मित्राला गिफ्ट देत पुन्हा त्यांची मैत्री किती वेगळी सिद्ध केलं आहे.

मिका सिंग करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची एकूण मालमत्ता 100 कोटींची आहे. त्यांचे मुंबईत आलिशान घर आणि फार्म हाऊस आहे. याचबरोबर त्याने दिल्लीत एक आलिशान अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे. मिका सिंगकडेही प्रायव्हेट जेट आहे. त्याला महागड्या कारचाही शौक आहे. BMW आणि Audi च्‍या अशा अनेक महागड्या गाड्या त्याच्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT