Mika Singh  esakal
मनोरंजन

Mika Singh Throat Infection: गायक मिका सिंगची प्रकृती खालावली! झालं 15 कोटींचं मोठं नुकसान

Vaishali Patil

Mika Singh Health: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक मिका सिंग हा सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिका सिंग हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. प्रकृती बिघडल्याने तो परदेशातच अडकला अन् त्यामुळे त्याचे 15 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिकाने एका मुलाखतीत खुलासा केला की त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत हे पहिल्यांदाच असं घडलं की त्याला त्याच्या तब्येतीमुळे त्याचे कॉन्सर्ट रद्द करावे लागले. जेव्हा मिकाच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा तो नेहमीच काळजी घेतो आहे.

त्याने सांगितले की, यूएसमध्ये बॅक टू बॅक शो केले दरम्यान त्याला विश्रांती मिळाली नाही, ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर, घशावर त्याचा परिणाम झाला. अमेरिकेनंतर त्याला बाली, मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शो करायचे होते. मात्र पकृती बिघडल्यानंतर त्याला ते शो रद्द करावे लागले.

मिकाच्या घशात इन्फेक्शन झाल्यामुळे तो त्याच्या कॉन्सर्टमध्येही परफॉर्म करू शकत नव्हता. त्यामुळे त्याचे जवळपास 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शोमध्ये परफॉर्म न केल्यामुळे त्याला अनेकांचे पैसेही परत करावे लागले आहेत.

मिका म्हणाला की, 'काही लोकांनी मला खूप पाठिंबा दिला आणि सीडी आणि लिप सिंकच्या माध्यमातून मला गाण्याची परवानगी दिली.

मिका सिंग सध्या वर्ल्ड टूर करत होता, त्याचे वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. नुकताच त्याने डॅलस (अमेरिका) येथे कार्यक्रम केला होता. तेथील वातावरणाचा परिणाम त्याचा घशावर परिणाम झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला 25 तास प्रवास करण्यास मनाई केली.

मात्र पुढे मिका सिंगने चाहत्यांना सांगितले की आता त्याची तब्येत पूर्वीपेक्षा बरी आहे. आता तो हळूहळू बरा होत आहे. लवकरच त्याचे परफॉर्मन्स बाली, सिंगापूर, मलेशिया, जकार्ता आणि इतर अनेक देशांमध्ये होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT