Milind Gawali shared post and memorable video for actress supriya pathare birthday  sakal
मनोरंजन

Milind Gawali: ती गोष्ट माझ्या मनामध्ये राहून गेली..सुप्रिया पाठारे यांच्यासाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट..

अभिनेत्री मिलिंद गवळी यांनी सांगितले सुप्रिया पाठारे यांच्यासोबतचे खास किस्से..

नीलेश अडसूळ

Milind Gawali News: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.

त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. पन्नाशी उलटून गेली तरीही मिलिंद गवळी आजही फिट आणि हँडसम आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतात.

आज त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. की पोस्ट आहे त्यांच्या एका खास मैत्रिणीसाठी. तेव्हा बघूया नेमकं मिलिंद गवळी काय म्हणाले आहेत.

(Milind Gawali shared post and memorable video for actress supriya pathare birthday)

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्ट सोबतच मिलिंद यांनी सुप्रिया सोबत काम केलेला एका जुन्या चित्रपटाचा विडिओही शेयर केला आहे.

मिलिंद म्हणतात, ''सुप्रिया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... सुप्रिया वीस बावीस वर्षांपूर्वी आपण श्री वि.के. नाईक यांचा हा चित्रपट केला होता “हे आपलं असंच चालायचं”.. आपण बहीण भावाची भूमिका केली होती. त्या चित्रपटाच्या इतक्या सुंदर आठवणी अजूनही माझ्या मनामध्ये घर करून बसले आहेत.''

पुढे ते म्हणतात, ''आपल्या त्या सेटवर एक प्रेमळ अवलिया होता, जो प्रत्येकाला पोट दुखेपर्यंत हसवायचा, तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका विजू मामा ( विजय चव्हाण ), खूप म्हणजे खूपच मजा आली होती तो चित्रपट करताना , पण त्यानंतर आपल्या ला एकत्र काम करायचा कधीच योग आला नाही, ही गोष्ट माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे''

''पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं नातं तितकच सुंदर आणि घट्ट आहे, तो तुझा पहिला चित्रपट होता , त्यानंतर तू अभिनय क्षेत्रात मागे वळून पाहिलंसच नाहीस, तुझे कष्ट , तुझी मेहनत तुझी चिकाटी and immense Talent, तुझं यश, तुझी प्रगती बघून मला खूप अभिमान वाटतो,
आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद, अशीच रहा, खूप खूप यशस्वी हो.. आतापर्यंत तुझ्या अभिनयाने आम्हाला खूप हसवलंस , तसंच नेहमी हसवत राहा, आणि तू ही हसत रहा आणि आनंदी राहा.'' अशा शब्दात गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT