milind gawali supriya pathare son mihir maharaj hotel  SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: "आई बापाच्या जीवावर मजा करणाऱ्या मुलांपेक्षा...", मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी नुकतंच ठाण्याला सुप्रिया पाठारेंच्या मुलाच्या हॉटेलला भेट दिली

Devendra Jadhav

Milind Gawali News: काही महिन्यांपुर्वी अभिनेत्री सुप्रिया पाठारेंच्या मुलाने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरु केलं. महाराज असं या हॉटेलचं नाव असुन पावभाजीसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे.

या हॉटेलला अनेक मराठी सेलिब्रिटी भेट देत आहेत. अशातच आई कुठे काय करते फेम अनिरुद्ध अर्थात सर्वांचे लाडके अभिनेते मिलिंद गवळींनी सुप्रिया पाठारेंचा मुलगा मिहीरच्या हॉटेलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिकडे आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय.

(milind gawali visit supriya pathare son mihir maharaj hotel in thane and share his experience)

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. हा व्हिडीओ पोस्ट करुन ते लिहीतात. “महाराज हॉटेल”सुप्रिया पाठारे यांचा चिरंजीव मिहीर यांनी ठाण्यामध्ये महाराज नावाचं एक हॉटेल सुरू केला आहे.
स्टार प्रवाहच्या दिवाळी सोहळ्यामध्ये माझी आणि सुप्रियाची भेट झाली तेव्हा मला तिच्याकडून कळलं की मिहीरने हॉटेल सुरू केलं आहे.
मी मिहीरला अगदी लहानपणापासून ओळखतो, मिहीरला शेफ व्हायचं होतं हे त्यांनी फार पूर्वीच आपल्या आई-वडिलांना सांगितलं होतं, मधल्या काळामध्ये त्यांनी एक फूड ट्रक सुरू केला होता, आणि आता त्यांनी महाराज नावाचं हॉटेल."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "passion , जिद्द , आवड या गोष्टी यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये हव्या असतात, मिहीर मध्ये शेफ बनण्याचं passion , ते पॅशन मला परवा प्रत्यक्षात पाहायला मिळालं, ज्यावेळेला त्याच्या हॉटेलला जेवणासाठी गेलो होतो,
तो स्वतः पावभाजी बनवत होता आणि ते बनवत असताना तो त्यामध्ये रमला होता, अगदी मन लावून तो ती पावभाजी बनवत होता, मला आणि दीपाला पाहिल्यानंतर तो म्हणाला मामा तुम्ही बसा मी तुम्हाला स्पेशल हरियाली पावभाजी खायला घालतो,
त्याने आम्हाला अतिशय चविष्ट पद्धतीच्या दोन वेगवेगळ्या पावभाज्या खाऊ घातल्या, त्यानंतर मस्त तवा पुलाव."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, त्यानंतर थोड्या वेळाने सुप्रिया हॉटेलमध्ये आली आम्ही गप्पा मारत बसलो पण माझं लक्ष मिहीरकडे होतं, तो अगदी एकाग्रतेने त्याचं काम करत होता, विराट कोहली तेंडुलकर कसं मन लावून त्यांचा तो खेळ खेळत असतात तसाच मिहीर त्याच्या आवडीचा खेळ खेळत होता, चविष्ट चवदार पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालत होता.
खरंच मला अभिमान वाटतो मिहीर सारख्या मुलांचा,
तो त्याचं पॅशन जोपासतोय कष्ट करतोय, आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करतोय,

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "जेव्हा आपण आजूबाजूला त्याच्याच वयाचे त्याच्या पिढीतले मुलं , आई बापाच्या जीवावर नुसती मजा करताना पाहतो,
स्वतःची काम सोडून अभ्यास सोडून वर्ल्ड कपच्या मॅचेस मध्ये
रमलेले पाहतो,
आणि महत्त्वाचं म्हणजे एक मराठी मुलगा बिझनेस करतोय, धंद्यामध्ये उतरला आहे, हीच यशाची पहिली पायरी आहे,
आणि खरंच मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो की भारतभर महाराज हॉटेलच्या शाखा उघडू देत,
मिहीर ला आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा...
यशस्वी भव.
आणि तुम्ही ठाण्यात असाल, डॉक्टर काशिनाथ घाणेकर सभागृहाच्या परिसरात असाल आणि पावभाजी खायची इच्छा झाली तर नक्की मिहीर च्या हॉटेल महाराज ला भेट द्या.."

अशी पोस्ट लिहून मिलिंद गवळींनी मिहीर आणि महाराज हॉटेलचं कौतुक केलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT