milind safai marathi actor passed away work in aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Milind Safai: आई कुठे काय करते मालिकेतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन

मिलिंद सफई यांनी आई कुठे काय करते मालिकेत अभिनय केलाय

Devendra Jadhav

Milind Safai Passed Away News: आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या वडीलांची भुमिका साकारणारे अभिनेते मिलींद सफई यांचं निधन झालं. आज सकाळी १०.४५ वाजता एक उत्तम कलाकार,हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेला मिलिंद सफई यांचे निधन झाले. अनेक मालिकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली आहे.

मिलिंद सफई यांनी आई कुठे काय करते मालिकेत साकारलेली ही भुमिका

मिलिंद सफई यांचं कॅन्सरने निधन झालं. सध्या गाजलेल्या आई कुठे काय करते मालिकेत त्यांनी सुरुवातीला काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल.

मिलिंद यांनी आई कुठे काम करते मालिकेत अरुंधतीच्या वडीलांची भुमिका भुमिका साकारलीय होती. मिलिंद मालिकेच्या सुरुवातीच्या भागात झळकले होते. मिलिंद यांनी अनेक मराठी मालिका, सिनेमा आणि नाटकात अभिनय केलाय.

मिलिंद सफई यांचं वर्कफ्रंट

मिलिंद सफाई यांनी शेवटपर्यंत आपल्या कामाने मराठी टीव्हीइंडस्ट्रीत स्वतःची ओळख जपली. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ते ठळकपणे ओळखले जातात.

मिलिंद यांनी मेकअप (2020), थँक यू विठ्ठला (2017), पोश्टर बॉयझ (2014), छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्‍टा (2013), टार्गेट (2010) आणि इतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलाय

कायमच हौशी कलाकारांना केलं मिलिंद यांनी मार्गदर्शन

मिलिंद सफई यांंनी तरुण पिढीतील हौशी कलाकारांना कायम मार्गदर्शन केलंय. मिलिंद सफई यांनी काही वर्षांपुर्वी सफल, कल्याण आयोजित रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्म्रुती अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या कल्याण केंद्रासाठी परीक्षक म्हणुन जबाबदारी निभावली होती.

मिलिंद सफई यांच्या निधनाबद्दल जयवंत वाडकर, सचिन गोस्वामी आणि इतर कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

Women’s World Cup 2025 Prize Money : वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाला किती कोटींचं बक्षीस मिळणार? ICC ने केलीय मोठी घोषणा

SSC HSC Exam Time Table : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT