ankita milind 
मनोरंजन

मिलिंद सोमण यांचा पत्नी अंकितासोबतचा पावसात डान्स करतानाचा रोमँटिक व्हिडिओ होतोय ट्रेंड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेते आणि फिटनेस मॅन म्हणून ओळखले जाणारे मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर बॉलीवूडचे सगळ्यात फिट कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघांची सोशल मिडियावर देखील चांगलीच चर्चा असते. दोघंही त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचे फिटनेसच व्हिडिओ शेअर करत अनेकांना प्रेरणा देतात. इतकंच नाही तर त्यांच्या रोमँटीक व्हिडिओंना देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळते. असाच एक रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये दोघंही रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ मिलिंद यांची पत्नी अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांना मिठी मारत पावसाचा आनंद घेत डान्स करत आहेत.

चाहत्यांसोबत शेअर केलेला हा व्हिडिओ पोस्ट करताना अंकिताने लिहिलंय, 'पावसाचे थेंब, संगीत आणि तु. यापेक्षा सुंदर काहीच नसू शकतं.' या व्हिडिओला त्यांनी लव्ह, डान्स, लाईव्ह सारख्या हॅशटॅगचा वापर करत मिलिंद सोमण यांना देखील टॅग केलं आहे.  मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर ही जोडी फिटनेसमुळे सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते.आणि फिटनेसविषयीच्या पोस्ट त्यांच्या चाहत्यांसाठी देखील शेअर करत असतात.

नुकतंच त्यांनी ७५ दिवसांनतर लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या पहिल्या जॉगिंगचा फोटो पोस्ट केला होता. या जॉगिंगची सुरुवात त्यांनी ५ किलोमीटर पासून केली होती. फिटनेससोबतंच दोघंही त्यांच्या लव्हलाईफमुळे चर्चेत असतात. त्यांच्या अफेअरमुळे तर सोशल मिडियावर चर्चेला उधाण आलं होतं.

अनेकदा दोघं  बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे देखील चर्चेत असतात. मात्र चाहत्यांना त्यांच्या लव्हलाईफच्या फोटो आणि व्हिडिओंची उत्सुकता असते आणि त्यांच्या पोस्टना चाहते पसंत देखील करतात.   

milind soman and ankita konwar seen dancing and enjoying the rains  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT