paurashpur
paurashpur 
मनोरंजन

व्हिडिओ: 'पौरशपुर'चा टिझर रिलीज होताच मिलिंद सोमण आणि अनु कपुर चर्चेत

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- गेले अनेक दिवस चर्चेत असलेली वेब सिरीज 'पौरशपुर'चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. टिझर रिलीज होताच मिलिंद सोमण आणि अनु कपूर सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या वेबसिरीजमध्ये मिलिंद सोमण 'बोरिस'ची भूमिका साकरत आहे तर दुसरीकडे अनू कपूर 'राजा भद्रप्रताप'च्या भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री शिल्पा शिंदे 'रानी मिरावती', शहीर शेख 'वीर सिंह', साहिल सलाथिया 'भानू', पोलोमी दास 'काला,' आदित्य लाल 'प्रिंस रणवीर' आणि अनंत विजय जोशी 'प्रिंस आदित्य'च्या भूमिकेत दिसून येतील. 

'पौरशपुर'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे म्हणजे रानी मिरावती तिच्या बुद्धीने पौरुषपुरला एक शक्तिशाली साम्राज्याचं स्वरुप देते. मिलिंद सोमण बोरिसच्या रुपातील एक चालाख, हुशार असा ट्रांसजेंडर आहे आणि एक असं व्यक्तिमत्व आहे जो राज्यातील पुरुष आणि महिला यांच्या समानवर प्रश्नचिन्ह उभं करतो. तसंच टिझरमधील मुख्य आकर्षण म्हणजे अनु कपूर.

राजा भद्रप्रताप सिंहच्या रुपात ते पौरषपुरच्या अगदी चुकीच्या साम्राज्यावर राज्य करत असतात. एक असं राज्य जिथे महिलांना इच्छा पूर्ण करणारी वस्तु मानलं जातं आणि त्यांना पुरुषांची संपत्ती म्हटलं जातं. तसंच जिथे पुरुषांनी केलेल्या मागणीचा विरोध करण्याची महिलांना परवानगी देखील नाहीये. हा टिझर रिलीज झाल्यापासून सोशल मिडियावर केवळ आणि केवळ मिलिंद सोमण आणि अनु कपूर यांच्या लूकची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांच्या भूमिकांविषयी देखील आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  या टिझरमधून कलाकारांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला आहे.  आता ८ डिसेंबरला या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज केला जाईल.    

milind soman and annu kapoor were overwhelmed after the release of paurashpur teaser  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT