milind soman bath
milind soman bath  
मनोरंजन

मिलिंद सोमणची रस्त्यात अंघोळ, नेटकरी म्हणाले हा कुठला व्यायाम?

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक म्हणून मिलिंद सोमण (milind soman) हा त्याच्या चाहत्यांना माहिती आहे. नेहमी आपण काही हटके करावं आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घ्यावं अशी त्याची सवय आहे. त्यामुळे आतापर्यत त्याला अनेक वादाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र त्याची पर्वा मिलिंदला नाही. जग काय म्हणेल याची पर्वा न करणाऱ्या मिलिंदला वाद निर्माण करणं आवडतं. त्याचे व्हिडिओही चमत्कारिक असतात. त्यामुळे तो चर्चेत असतो. आताही त्यानं असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नेहमीप्रमाणे तो यावरुन ट्रोल झाला आहे.

आपल्या फिटनेस फ्रिकसाठी प्रख्यात असणाऱ्या मिलिंदनं कोरोनाच्या काळात आपल्या चाहत्यांना मोठा आधार दिला होता. चाहत्यांनी फिटनेसचं महत्व जाणून घ्यावं यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमही करत असतो. अनेकदा त्यानं त्या क्षेत्रात पुरस्कारही मिळवले आहेत. त्यात त्याच्या जोडीला त्याची पत्नीही असते. हे दोघेही फिटनेसच्याबाबत कमालीचे दक्ष असतात. मिलिंद काही महिन्यांपूर्वी त्याच्या न्युड व्हि़डिओमुळे चर्चेत आला होता. गोव्याच्या एका समुद्रकिनाऱ्यावर न्युड अवस्थेत धावणं त्याला महागात पडलं होतं. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.

आता मिलिंद चर्चेत आला आहे याचे कारण म्हणजे त्यानं रस्त्यात केलेली अंघोळ. त्यावरुन तो ट्रोलही झाला आहे. रस्त्याच्या मधोमध बसुन त्यानं चक्क अंघोळ केली आहे. आणि तो यावेळी गाणंही म्हणत आहे. चाहत्यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी त्याला यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही विचारले आहेत.

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए असं गाणं मिलिंद म्हणत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसते. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, शुट हे नेहमीच मजेदार असतात. गरम पाणी, थंड पाणी आणि मॉन्सुनची अर्धी रात्र यापेक्षा आणखी काही भन्नाट असु शकतं का, असं तो म्हणाला आहे. मिलिंदच्या आगामी एका चित्रपटाची ही शुटिंग आहे. त्याला त्या व्हिडिओवर एका युझर्सनं कमेंट दिली आहे. त्यात तो म्हणतो भाऊ हा कुठल्या प्रकारचा व्यायाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT