Milind Soman esakal
मनोरंजन

Milind Soman: पुरुषांनो भांडी घासायला तयार राहा! 'मेन डिश वॉशर जेली'ची जाहिरात मिलिंदला पडली भारी

भारताचा सुपरमॉडेल असा उल्लेख ज्याच्याबाबत केला जातो त्या मिलिंद सोमणची नवी जाहिरात आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Milind Soman Trolled: भारताचा सुपरमॉडेल असा उल्लेख ज्याच्याबाबत केला जातो त्या मिलिंद सोमणची नवी जाहिरात आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तसा तो त्याच्या वादग्रस्त वक्तव्य, आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतोच. मिलिंदला चर्चेत राहणे आवडते. त्याची नवी जाहिरात सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

जीम करत असलेला तो तरुण आपण आईला भांडी घासण्यास मदत केल्याचे सांगतो. त्यामुळे मी फार थकलो आहे याचे कारण मी काल घरातील सगळी भांडी घासली आहे. त्याची ती गोष्ट मिलिंदनं ऐकल्यानंतर त्याला त्या नवीन भांडी घासण्याविषयीच्या साबणाची माहिती देतो. तू तर मोठ्या बाता मारल्या आहेस, आता तू त्या आणखी मारु शकतोस कारण तुझ्याकडे आहे व्हिम ब्लॅक लिक्विड. ज्यामुळे तुला काहीही अडचण येणार नाही.

Also Read- सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

त्या व्हिडिओच्या शेवटी मिलिंद पोझ देतो म्हणतो, हे घे व्हिम ब्लॅक, भांड्यांची साफसफाई करण्यात मदत करते. मिलिंदनं इंस्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा विरोध होताना दिसतो आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनवर त्यानं लिहिलं आहे की, व्हिम ब्लॅक, पुरुषांसाठीचे डिशवॉशिंग लिक्विड...

लोकांनी घेतली मिलिंदची शाळा....

सोशल मीडियावर मिलिंदची ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे, ती जाहिरात लिंग भेदभाव करते असा आक्षेप नेटकऱ्यांनी घेतला आहे. त्यामध्ये केवळ पुरुषांना लक्ष्य केले आहे. त्यात मिलिंदनं अशा प्रकारची जाहिरात करणे हे चुकीचे आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील मिलिंदच्या वेगवेगळ्या चित्रपटांवर नेटकऱ्यांनी आगपाखड केली होती. एका युझर्सनं मिलिंदच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भावा, आपल्याला अंघोळ करायची नाही. भांडी घासण्यामध्ये कसला आलाय भेदभाव....दुसऱ्यानं लिहिलं आहे की, काय मुर्खपणा आहे हा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Cabinet: बिहारमध्ये NDA सरकारचा मेगा विस्तार! निशांत कुमारांसह ३२ मंत्र्यांची एन्ट्री, कोणाला मिळाले मंत्रिपद? पाहा यादी...

Shocking: युझवेंद्र चहलचा 'व्हॅपिंग' करतानाचा Video Viral; रियान पराग, तर ड्रेसिंग रूममध्ये 'फुकत' होता, हा तर थेट विमानात...

शेअर विकले, कर्ज घेतले... ४० लाख उकळल्यानंतर घरही विकणार होते; डिजिटल अरेस्ट प्रकरणात भांडुपचे कुटुंब थोडक्यात वाचले

बहुमत डावलून भाजपला आमंत्रण देत शपथही दिलेली, आता विजयसाठी अट का? राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न

Pre Monsoon Rain Alert : कोकणच्या हापूसवर पावसाचं सावट! सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; बागायतदारांची धास्ती वाढली

SCROLL FOR NEXT