milind soman 
मनोरंजन

मिलिंद सोमणने केली सातवेळा कोरोना टेस्ट, वाचा का केलं असं?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. भारतात या खतरनाक व्हायरसचं सावट अजुनही आहे. काही सेलिब्रिटींनी तर कोरोना व्हायरसमुळे या जगाचा निरोप घेतला. यादरम्यान बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमण यांनी खुलासा केला आहे की त्यांनी आत्तापर्यंत सातवेळा कोविड-१९ची टेस्ट केली आहे. 

मिलिंद सोमणने हा खुलासा सोशल मिडियावर केला आहे. ते सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात. मिलिंद सोमण अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया देत असतात. त्यांनी सोशल मिडियावर खुलासा केला आहे की त्यांनी आत्तापर्यंत सातवेळा कोविड-१९ची टेस्ट केली आहे. मिलिंद सोमणने यामागचं कारण देखील सांगितलं आहे. 

मिलिंद सोमणने त्यांच्या ट्विटरवर लिहिलंय, 'काल सातवी कोविड टेस्ट केली जी निगेटीव्ह आली. लोकल ऍथॉरिटीजच्या म्हणण्यानुसार दरवेळी कोणा दुस-या शहरात किंवा देशात जाण्याआधी कोविड टेस्ट करावी लागली आहे.' सोशल मिडियावर मिलिंद सोमणचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिलिंद सोमणचे कित्येक चाहते त्याच्या या ट्विटवर कमेंट देत आहेत. 

याआधी मिलिंद सोमण सोशल मिडियावर त्यांचा न्यूड फोटो शेअर केल्याने चर्चेत आले होते. या फोटोवर कित्येकांनी विरोध दर्शवला होता. इतकंच नाही तर मिलिंद सोमण विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात अश्लिलता पसरवण्याच्या आरोपामध्ये केस दाखल करण्यात आली आहे.  

milind soman has tested coronavirus test seven time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Sugar Factory Membership: कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासदत्व बंद; साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे भीमाशंकर कारखान्याच्या प्रस्तावाला ब्रेक

MNLU Nagpur VC Appointment: डॉ. ज्योती भाकरे यांची नागपूरच्या 'महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'च्या (MNLU) कुलगुरूपदी निवड

राहुल द्रविडच्या पोराची २११ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई! आर्यवीर सेहवागच्या पदार्पणात २८ धावा

MIDC Land Acquisition: महागावात एमआयडीसी भूसंपादन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी थांबवावी लागली

SCROLL FOR NEXT