Milind Soman-Madhu Sapre's controversial ad featured in Aamir Khan's 'Laal Singh Chaddha' Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha आणि मिलिंद सोमणचा न्यूड फोटो, समोर आलं मोठं कनेक्शन,वाचा

लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यानंतर आता रोज एक नवीन खुलासा होताना दिसत आहे आणि ज्यावरुन नवनवे वाद रंगताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची जशी चर्चा रंगली तसा याच संदर्भातला जुना एक वाद पुन्हा नव्यानं समोर आला. ९० च्या दशकात मिलिंद सोमण (Milind Soman)आणि मधू सप्रे यांच्या न्यूड फोटोशूटचा(Nude Phototshoot) वाद बराच रंगला होता. ते एका शूज कंपनीच्या जाहिरातीसाठी केलेलं फोटोशूट होतं. पण आता हा फोटो अनेक वर्षांनी थेट सिल्व्हर स्क्रिनवर झळकला आहे. चला जाणून घेऊया या संदर्भात.(Milind Soman-Madhu Sapre's controversial ad featured in Aamir Khan's 'Laal Singh Chaddha')

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाला ओपनिंग फारसं चांगलं मिळालं नाही. रक्षाबंधनच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी रणवीर सिंगला जिथे आपल्या न्यूड फोटोसाठी पोलिसांनी दिलेल्या नोटीशीचा सामना करावा लागत आहे, तिथे लाल सिंग चड्ढा सिनेमात मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांचा न्यूड फोटो दाखवला गेल्याचा खुलासा झाला आहे . ९० च्या दशकातील प्रसिद्ध शूज कंपनीच्या या वादग्रस्त जाहिरातीला आता मोठ्या पडद्यावर दाखवलं गेल्यानं नवीन खलबतं सुरू झाली आहेत.

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाने सेल्युलाइडवर या जाहिरातीचा वापर केला आहे. यामध्ये मिलिंद सोमण आणि मधु सप्रे ऑनस्क्रीन दिसतात, आणि या फोटोचा संदर्भ थेट सिनेमातील लाल सिंग चड्ढाची बालमैत्रीण, लालचं प्रेम रुपा हिच्यासंदर्भात घडलेल्या एका अशाच घटनेशी जोडला गेला आहे. त्याच्याशी संदर्भ जोडण्यासाठी फक्त मिलिंद सोमणचा तो न्यूड फोटो सिनेमात वापरल्याची चर्चा आहे. सिनेमात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे लाल सिंग चड्ढा संदर्भात रोज एक नवा वाद कानावर पडतोय. पण इतक्या वादांनी चर्चेत राहूनही बॉक्सऑफिस कलेक्शनवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. म्हणजे वादातून निर्माण झालेल्या उत्सुकतेपोटीही प्रेक्षक सिनेमागृहाकडे फिरकलेला दिसला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT