milind soman 
मनोरंजन

Video : २६ वर्षांनंतर मिलिंद सोमणचा रॅम्प वॉक; अनुभवी मॉडेल्सही पडतील फिके

५५ वर्षीय मिलिंदच्या या रॅम्प वॉकसमोर अनुभवी मॉडेल्सही फिके पडतील असा हा व्हिडीओ आहे.

स्वाती वेमूल

अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणचे Milind Soman आजही लाखो चाहते आहेत. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मिलिंदला १९९५ साली 'मेड इन इंडिया' Made in India या गाण्यामुळे खास ओळख मिळाली. त्यानंतर आता तब्बल २६ वर्षांनंतर मिलिंद रॅम्प वॉक करताना दिसला आहे. एमटीव्हीच्या 'सुपरमॉडेल ऑफ द इअर २' या शोमध्ये मिलिंदने धोतीमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला आहे. ५५ वर्षीय मिलिंदच्या या रॅम्प वॉकसमोर अनुभवी मॉडेल्सही फिके पडतील असा हा व्हिडीओ आहे. एमटीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मिलिंदनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. '..आणि २६ वर्षांनंतर.. पुन्हा एकदा' असं कॅप्शन मिलिंदने या व्हिडीओला दिलं आहे.

मिलिंदचा हा रॅम्प वॉक पाहून शोमध्ये उपस्थित असलेले पाहुणेसुद्धा अवाक् झाले आहेत. अभिनेत्री मलायका अरोरासुद्धा मिलिंदला पाहून थक्क झाली. या व्हिडीओवर मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिनेसुद्धा कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. केवळ १८ तासांत या व्हिडीओला लाखो लाइक्स मिळाले आहेत. २६ वर्षांपूर्वी मिलिंदचा हाच लूक गायिका अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' या गाण्यात दिसला होता.

मिलिंद सध्या त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जात असला तरी मॉडेलिंगविश्वात त्याने स्वत:ची एक वेगळी छाप सोडली आहे. १९८९ साली त्याने पहिल्या जाहिरातीसाठी शूट केलं होतं. त्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये करिअर करता येतं हेदेखील मिलिंदला माहित नव्हतं. एका तासासाठी मिलिंदला त्यावेळी ५० हजार रुपये देण्यात आले होते. मॉडेलिंगच्या दिवसांतील ही आठवण खुद्द मिलिंदनेच सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सांगितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT