milind soman 
मनोरंजन

मिलिंद सोमण 'या' कपड्यांमध्ये धावणार मॅरेथॉन; फोटो पाहून नेटकरी पडले पेचात

स्वाती वेमूल

फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन ही बिरुदावली मिरवणारा अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही फोटो पोस्ट करत पुढील मॅरेथॉन सूट परिधान करून धावणार असल्याचं सांगितलं. त्याचं हे कॅप्शन पाहून नेटकरीसुद्धा पेचात पडले आहेत. 

टक्सिडोमधले फोटो पोस्ट करत मिलिंदने लिहिलं, 'फार जुना फोटो नाही, फक्त दोन महिन्यांपूर्वीचा आहे. पण आता मीच मला सूटमध्ये आवडू लागलोय. कदाचित पुढच्या मॅरेथॉनमध्ये मी टक्सिडो परिधान करून धावेन.' मिलिंदच्या या फोटोला अवघ्या दोन तासांत दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या या अजब कल्पनेचं कौतुक केलंय. फॅशन असो किंवा मग आणखी काही.. मिलिंद नेहमीच बेधडकपणे सोशल मीडियावर व्यक्त होतो. पण यामुळे अनेकदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

मिलिंदसोबतच त्याची पत्नी अंकिता कोनवार आणि आई उषा सोमण हेसुद्धा फिटनेस फ्रिक आहेत. ८१ वर्षांच्या उषा सोमण आताही साडी नेसून दोरीवरच्या उड्या, पुशअप्स असे व्यायामाचे प्रकार सहजपणे करतात. त्यांचे व्हिडीओ मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ८१व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT